आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट्रोपासून रस्त्यापर्यंत Jeans शिवाय फिरत होती मुलगी, लोकांनी दिल्या अशा रिअॅक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल न्यूड होती. तिने बॉडी पेंट केले होते परंतू मेट्रो आणि रस्त्यावर तिला कोणीही ओळखले नाही. - Divya Marathi
मॉडेल न्यूड होती. तिने बॉडी पेंट केले होते परंतू मेट्रो आणि रस्त्यावर तिला कोणीही ओळखले नाही.

जग हे अतरंगी आणि अनोख्या लोकांनी भरलेले आहे. कोणाच्या डोक्यात केव्हा काय येईल, काही सांगता येत नाही. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर लोक दुसऱ्यांकडे किती लक्ष देतात हे तपासण्यासाठी एका मॉडेलने जे केले, ते वाचून आणि पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहाणार नाही. 

 

मॉडेल विदाऊट जिन्स फिरली रस्त्यावर 
- न्यूयॉर्कमधील लोक स्वतःशिवाय दुसऱ्यांवर किती लक्ष देतात हे पाहाण्यासाठी एक एक्सपेरिमेंट करण्यात आले. मॅनहॅटनच्या रस्त्यावर मॉडेल लीह जंग कमेरखाली काहीही न घालता अवतरली. तिने कमरेखाली बॉडी पेंट केली होती. तिचे पाय अशा पद्धतीने पेंट करण्यात आले होते जणूकाही तिने जिन्स घातलेली आहे. 
- वरती लीहने व्हाइट कलरचे जॅकेट घातलेले होते. 
- एखादी मुलगी, तिही मॉडेल जर रस्त्यावर न्यूड फिरत असेल, तरीही कोणाचे तिच्याकडे लक्ष जणार नाही, असे होऊ शकते का? 

 

मेट्रोमधून केला प्रवास 
- लीह जंग फक्त रस्त्यावर फिरली नाही, तर तिने मेट्रोने प्रवास केला. कॉफी शॉपमध्ये ती गेली. अनेक सार्वजनिक ठिकाणी ती गेली आणि लोक दुसऱ्यांकडे किती बारकाईने पाहातात हे तपासले. 
- आश्चर्य म्हणजे मेट्रोमध्ये एक न्यूड मुलगी प्रवास करत असतानाही कोणाचेही तिच्याकडे लक्ष गेले नाही. 

 

कोणालाच दुसऱ्यांकडे पाहाण्याची नाही फूरसत 
- मॉडेल लीह जेव्हा टाइम्स स्केअर येथून गेली तेव्हा तिच्या टीमला अपेक्षा होती की आता तरी कोणाचे ना कोणाचे तिच्याकडे लक्ष जाईल. मात्र येथेही तिच्यासह तिच्या टीमची निराशा झाली. 
- एवढेच नाही तर McDonaldमध्ये जाऊन तिने लंचही केला परंतू कोणीही तिच्याकडे पाहिले नाही. 

 

शेवटी एकाचे गेले लक्ष...
- दिवसभर फिरल्यानंतर जेव्हा मॉडेल लीह परत निघाली, त्यासाठी ती मेट्रो स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी उभी राहिली तेव्हा एकाने तिच्या रंगीत पायांचे रहस्य ओळखले. त्याने मोबाइल काढला आणि लीहचे फोटो घेऊ लागला. 
- या प्रयोगावरुन हे सिद्ध झाले की आजच्या जगात कोणालाही दुसऱ्याकडे पाहाण्यासाठी वेळ नाही. लोक स्वतःमध्येचे एवढे गुरफटलेले आहेत की त्यांना आपल्या आजुबाजूला काय घडत आहे हे एक नजर पाहाण्यासही वेळ नाही. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, या एक्सपेरिमेंटचे काही बोलके फोटो...  

बातम्या आणखी आहेत...