आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- डावखुऱ्या व्यक्ती नास्तिक असण्याची शक्यता अधिक असते. फिनलंड येथील आेलू विद्यापीठातील संशोधकांनी याविषयी अध्ययन केले. आैद्योगिक क्रांतीपूर्वीपासून याचे तपशील संशोधकांनी तपासले. आैद्योगिक क्रांतीपूर्वीच्या मानवी समुदायात स्थैर्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक वर्तनाची पद्धती अधिक शिस्तबद्ध होती. त्यानंतर झालेल्या आनुवंशिक बदलांमध्ये डावखुऱ्या व्यक्तींचे प्रमाण वाढले. तसेच ऑटिझमही (स्वमग्नता ) अधिक प्रमाणात समोर आला. या संशोधनाचा अहवाल जर्नल इव्होल्युशनरी सायकॉलॉजिकल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
आैद्योगिक क्रांतीपूर्व समाजात अत्यंत धार्मिक असणाऱ्या समुदायातील व्यक्तींचे वंशज आधुनिक युगात धार्मिक राहिले, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. नास्तिकता ही उपजत असू शकत नाही. आैद्योगिकीकरणाच्या रेट्यामध्ये मानवी समुदायात झालेले बदल तात्पुरते होते. ते वेळोवेळी बदलले. नास्तिकतावाद ठोस सिद्धांत नसून त्यातही प्रचंड लवचिकता आहे. याचा परिणाम मानवाच्या आनुवंशिक गुणांवर झाला, असे आपल्या सिद्धांतात संशोधकांनी मांडले आहे. बदलांच्या दबावामुळे वर्तनपद्धतीत समग्रता राहिली नाही.
डावखुरे अनेकदा असतात स्किझोफ्रेनियाग्रस्त
संशोधकांच्या निरीक्षणानुसार डावखुऱ्या व्यक्ती अनेकदा स्किझोफ्रेनियाग्रस्त (ज्या रोगामध्ये विचार, भावना व कृती यांमध्ये फारकत पडत जाते असा मानसिक रोग) किंवा ऑटिस्टिक (स्वमग्नताग्रस्त) असल्याचे दिसून येते. त्यांना धार्मिक विचारांशी फारसे सोयरसुतक नसते. द टेलिग्राफने यासंबंधी सविस्तर वृत्तांत दिला आहे. यापूर्वी नास्तिक असण्याविषयी झालेल्या संशोधनातून याची कारणे आनुवंशिक असल्याचे निष्कर्ष निघाले आहेत. डावखुऱ्या व्यक्ती व नास्तिक यांचे तुलनात्मक अध्ययन प्रथमच फिनलँड येथील संशोधकांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.