आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING: अवघ्या 4 वर्षांच्या बहिणीवर केले 17 वार, या गोष्टीचा होता राग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी पॅरिस आणि पाठीवर त्याची पीडित बहिण एला... - Divya Marathi
आरोपी पॅरिस आणि पाठीवर त्याची पीडित बहिण एला...

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील टेक्सास प्रातंता 24 वर्षीय तरुण आपल्या बहिणीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात आहे. त्याने वयाच्या 13 व्या वर्षीय आपल्या आईवर सूड उगवण्यासाठी आपल्या 4 वर्षीय बहिणीचा खून केला होता. गेल्या दशकभरापासून तो तुरुंगात आहे. पण, आईचे प्रेम पाहा, तिने या कृत्यासाठीही आपल्या मुलाला माफ केले आणि आजही वारंवार आपल्या मुलाची भेट घेण्यासाठी तुरुंगात जाते. 

 

असा केला होता खून...
> टेक्सासच्या एबिलेने येथे आरोपी पॅरिस ली आपली आई चॅरिटी आणि बहिण एलासोबत राहत होता. 
> पॅरिसने 5 फेब्रुवारी 2007 रोजी हे कृत्य केले तेव्हा तो 13 वर्षांचा होता आणि त्याची बहिण एला फक्त 4 वर्षांची होती. 
> पॅरिसने आपल्या आयाला घरातून जाऊ दिले. नतंर बेडवर झोपलेल्या सावत्र बहिण एलावर चाकूने प्रहार केले. 
> त्याने एलावर धारदार चाकूने तब्बल 17 वार केले होते. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्यानेच पोलिसांना फोन लावून बोलावले. 
> पोलिसांनी घरी पोहचून आई चॅरिटीला फोन केला तेव्हा तिला विश्वासच बसला नाही. घरी आली तेव्हा आपल्या 4 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह विक्षिप्त अवस्थेत पडला होता. 
> कोर्टाने आरोपी पॅरिसला 40 वर्षांची कैद सुनावली. अमेरिकेत अल्पवयीनांना सुनावली जाणारी ही कमाल शिक्षा आहे. 


या रोगाने होता ग्रस्त
2009 मध्ये पॅरिस सोशियोपॅथ नावाच्या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. पॅरिसने मर्डरनंतर आपण एका भ्रमामध्ये ही हत्या केल्याचे सांगितले. यानंतर त्याने हे कृत्य करताना आपण मानसिकरीत्या तयार होतो. तसेच आईवर सूड उगवण्यासाठी असे केल्याची कबुली दिली. 

 

या गोष्टीवर होता नाराज
- पॅरिसने यानंतर आपल्या आईला सांगितले होते, की त्याने सूड उगवण्यासाठीच आपल्या 4 वर्षीय बहिणीचा खून केला. 
- आई चॅरिटी अमली पदार्थांच्या आहारी गेली होती आणि त्याला नेहमीच नशेत असणाऱ्या आईला पाहून संताप व्हायचा.
- चॅरिटी पॅरिसच्या जन्मापूर्वी अमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त झाली होती. मात्र, काही वर्षांनंतर ती पुन्हा त्याच ड्रग्सच्या आहारी गेली होती. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...