आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहिंग्या मुस्लिमांची 55 गावे बेचिराख, पुरावा आहेत हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिम विरोधी हिंसाचार अजुनही थांबलेला नाही. ज्या मोजक्या गावांमध्ये रोहिंग्या राहत होते, त्या 55 गावांना देखील बेचिराख करण्यात आले आहे. मानवाधिकार निरीक्षकांनी त्या घटनास्थळांचे फोटोज आणि सॅटेलाइट इमेज जारी केले. तसेच म्यानमार सरकार दंगलखोरांसोबत मिळून रोहिंग्या मुस्लिमांचा नरसंहार करत असल्याचे आरोप लावले. एवढेच नव्हे, तर या देशातील सरकारवर आंतरराष्ट्रीय समुदायाने कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली. 

 

- मानवाधिकार निरीक्षकांनी सांगितले, की एकेकाळी रोहिंग्या मुस्लिम बहुल प्रांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॅखीन येथे लष्कराने सरकारच्या इशाऱ्यांवर नरसंहार केला. सोबतच, पुरावे नष्ट करण्यासाठी साऱ्या घरांना आग लावली. 
- पोलिस स्टेशनवर हल्ला प्रकरणी गावांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या लष्कराने ही कारवाई केली. त्या गावांतील लोकांनी पोलिसांवर हल्ले केले होते असे आरोप आहेत. 
- अख्खे गावचे-गाव पेटवून देणाऱ्या लष्कराने त्या-त्या गावांमध्ये जाऊन पुरावे नष्ट करण्याचे कामही सुरू केले. जेणेकरून चौकशी झाल्याच्या परिस्थितीत स्वतः पकडले जाणार नाही. 
- कोलोरॅडो येथील डिजिटल ग्लोबने सॅटेलाइट फोटो जारी केले आहेत. त्यामध्ये रोहिंग्यांवर कसे अत्याचार झाले असतील याची कल्पनाच केली जाऊ शकते. 
- सरकारी सुरक्षा रक्षक आणि दंगलखोरांच्या भितीने आतापर्यंत 7 लाख रोहिंग्या मुस्लिम म्यानमार सोडून बांग्लादेशच्या सीमेवर शरण आले आहेत.
- शेकडो वर्षांपूर्वी म्यानमारमध्ये वसलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना आजही म्यानमारचे नागरिकत्व देण्यात आले नाही. विशेष म्हणजे, शांततेचे नोबेल मिळवणाऱ्या म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांनीही रोहिंग्यांवरील अत्याचारांचे समर्थन केले.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जळितकांड, नरसंहार आणि अमानवीय अत्याचाराचे आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...