आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवर होणाऱ्या अमानवयी अत्याचार आणि सामुहिक नरसंहाराची आणखी एक घटना समोर आली आहे. नुकतेच म्यानमारच्या दोन गावांमध्ये झालेल्या हिंसाचाराचे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये रोहिंग्यांचे हात बांधून एका रांगेत बसवण्यात आले आहे. यानंतर एकाचवेळी सर्वांना ठार मारण्यात आले. रॉयटर्सने जारी केलेली ही छायाचित्रे सप्टेंबर महिन्याची आहेत. म्यानमारचा ओसामा बिन लादेन म्हणूनही कुप्रसिद्ध असलेल्या बौद्ध नेत्याच्या समर्थकांनी या हिंसाचारात सहभागी असल्याची कबुली दिली आहे.
असा सुरू झाला संघर्ष...
- रॅखीन प्रांतात 25 ऑगस्ट रोजी पुन्हा उसळलेल्या हिंसाचारात रोहिंग्या मुस्लिम युवकांनी कथितरीत्या एका पोलिस स्टेशनवर हल्ला केला. त्यानंतर पोलिस आणि लष्कराने त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.
- हिंसाचार तसेच लष्कर आणि पोलिसांच्या कारवाईमुळे आता तेथील रोहिंग्या मुस्लिमांना देश सोडून पळ काढावा लागत आहे. ते सगळेच बांगलादेशच्या दिशेने निघत आहेत.
- पलायन करण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाईच नव्हे, तर बौद्ध समुदायाकडून होणाऱ्या हल्ल्यांना सुद्धा एक मोठे कारण मानले जात आहे. ते राहत असलेल्या शेकडो गावांवर स्थानिक बौद्ध समुदायाचे हल्ले झाले आहेत. याच भितीने ते पलायन करण्यासाठी विवश आहेत.
- रोहिंग्या मुस्लिम समुदाय म्यानमारचे मूळ निवासी नसल्याचे सांगत त्यांना बाहेर काढले जात आहे. शेकडो वर्षांपासून म्यानमारमध्ये राहत असतानाही सरकारने अद्याप त्यांना नागरिकाचा दर्जा दिला नाही. उलट या मुस्लिमविरोधी हिंसाचारांवर आंतरराष्ट्रीय संताप असतानाही सरकारचे त्यास समर्थन आहे.
- भारतासह कुठल्याही इतर देशाने त्यांना शरण देण्यास स्पष्ट नकार दिला. म्यानमारच्या सुरक्षा रक्षकांवर सुद्धा त्यांच्या हिंसाचाराचे आरोप लावले जात आहे. मात्र, पोलिस आणि लष्कराने सांगितल्याप्रमाणे, रोहिंग्या समुदाय त्यांच्यावर हल्ले करत असल्याने सुरक्षा रक्षक प्रत्युत्तर देत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे आणखी काही फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.