आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींसोबत पतंगबाजी, कालीबाटा येथे शहीदांना वाहिली श्रद्धांजली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींसोबत जकार्तामध्ये पतंगबाजी केली. - Divya Marathi
मोदींनी इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींसोबत जकार्तामध्ये पतंगबाजी केली.

जकार्ता - तीन देशांच्या पाच दिवसीय दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे पोहोचले आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विदोदो यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही देशांचे नेते कालीबाटा स्मारकावर गेले, येथे त्यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दोन्ही नेत्यांची शिष्टमंडळ चर्चेला सुरुवात झाली. यात सागरी मार्ग, व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भात द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा होईल. दोन्ही नेते सीईओ बिझनेस फोरमच्या बैठकीतही सहभागी होणार आहेत. येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर मोदी मलेशिया आणि सिंगापूरला जातील. 

 

इंडोनेशियात दोन दिवसांचा मुक्काम 
- पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या विदेश दौऱ्यावर गेले आहेत. यात ते तीन देशांच्या नेत्यांची भेट घेणार आहे. या दौऱ्यात संरक्षणासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होईल. 
- मोदींचा इंडोनिशियाचा पहिला तर सिंगापूरचा हा दुसरा दौरा आहे. 

 

कालीबाट येथे कोणत्या सैनिकांचे स्मरण केले 
- दुसऱ्या महायुद्धावेळी इंडोनेशियाला डचांच्या तावडीतून मुक्त करण्यात आले होते, या युद्धात कामी आलेल्या 1000 जपानी सैनिकांना कालीबाटा येथे दफन करण्यात आलेले आहे. इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य लढ्यात या जपानी सैनिकांनी त्यांना साथ दिली होती. 1953 मध्ये ही स्मशानभूमी तयार करण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...