आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जग आपल्याकडे अभिमानाने पाहात आहे, हा बदललेला भारत आहे: जकार्तामधील भारतीय समुदायासमोर मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्तामध्ये भारतीय समुदायासमोर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. - Divya Marathi
जकार्तामध्ये भारतीय समुदायासमोर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

जकार्ता - पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या विदेश दौऱ्यावर आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियाला पोहोचले आहेत. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये बुधवारी सकाळी त्यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विदोदो यांच्यासोबत शिष्टमंडळ चर्चा केली. दोन्ही देशांच्या नेत्यांनी शिक्षण, उद्योग, सागरी सुरक्षा, व्यापार, रेल्वे, आरोग्य आणि गुंतवणुकीसह 15 करारांवर स्वाक्षरी केली. संयुक्त पत्रकार परिषदेनंतर मोदी आणि विदोदो यांनी रामायण महाभारत थीमवर तयार करण्यात आलेल्या पतंग प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी मोदींनी येथे पतंग उडवण्याचा आनंदही घेतला. त्यानंतर दोन्ही नेते इंडोनेशियाची प्रसिद्ध मशिद इस्तिकलाल येथे गेले, दोघांनीही काही वेळ मशिदीत घालवला. त्यानंतर ते अर्जुन रथ पाहाण्यासाठी सेंट्रल जकार्ता येथे पोहोचले. मुस्लिम बहुल देशात अर्जुनाची ही मूर्ती म्हणजे तिथे हिंदू संस्कृतीचा असलेला प्रभाव मानली जाते. 

 

दक्षिण-पूर्व आशियातील सर्वात मोठी मशिद पाहाण्यास गेले मोदी 
- इस्तिकलाल मशिद ही दक्षिण-पूर्व आशियातील सर्वात मोठी मशिद मानली जाते. 1978 मध्ये ही मशिद बांधण्यात आली आहे. इस्तिकलाल याचा अर्थ 'स्वातंत्र्य' असा होतो. या मशिदीचे आर्किटेक्ट हे ख्रिश्चन धर्मिय फ्रेडरिक सिलाबेन आहेत, त्यांनी या मशिदीचे डिझाइन तयार केले. यावरुन लक्षात येते की इंडोनेशियामध्ये बहुविध संस्कृती वास करते. 

 

मोदींनी पाहिला अर्जुनाचा रथ 
- इस्तिकलाल मशिदीला भेट दिल्यानंतर मोदी आणि विदोदो हे अर्जुनाचा रथ पाहाण्यासाठी पोहोचले. महाभारतातील युद्धात भगवान श्रीकृष्ण अर्जनाचे सारथी झाले होते. कुरुक्षेत्रावरील त्यांच्या रथाचा नजारा सेंट्रल जकार्ताच्या एका डोंगरावर कोरण्यात आला आहे. 
- अर्जुनाच्या रथाला आठ घोडे जुंपलेले आहेत. जावाच्या अख्यायिकेनुसार यांना अष्टव्रत म्हटले गेले आहे. हे आठ अश्व म्हणजे किस्मा (धरती), सूर्य, अग्नी, कार्तिक (तारे), वरुण (जल देवता), समीरन (वायू देवता), तीर्त (पाऊस) आणि केंद्रा (महिने) यांचे प्रतीक आहेत. 
- सेंट्रल जकार्ता येथे ही कलाकृती 1987 मध्ये तयार करण्यात आली आहे. भारतातून जकार्ताला जाणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक प्रमुख आकर्षण केंद्र आहे. 

 

इंडोनेशियावर आहे रामायण - महाभारताचा प्रभाव 
- ज्या पद्धतीने भारतात रामायण आणि महाभारत हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत, या ग्रंथांबद्दल इंडोनेशियातही तेवढेच आकर्षण आहे. यावरुन असे म्हटले जाते की इसवी सणापूर्वीपासून दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ संबंध राहिले आहेत. इंडोनेशिया आणि भारत यांच्यात अनेक वर्षांपासून व्यापारी संबंध राहिले आहेत. 

 

2025 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 50 बिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य 
- मोदी पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच इंडोनेशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. येथे राष्ट्रपती भवन 'मर्डेका पॅलेस'मध्ये त्यांचे शाही स्वागत झाले. मोदी आणि विदोदो यांनी येथे शिष्टमंडळ चर्चा केली. त्याआधी दोन्ही नेत्यांनी बराचवेळ बातचीत केली. 
- संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी सांगितले, की राष्ट्रपती विदोदो यांच्यासोबतच्या बैठकीत सागरी मार्ग, आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. याशिवाय दोघांनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा केली. 
- भारत आणि इंडोनेशिया 2025 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 50 बिलियन डॉलर्स (जवळपास 3 हजार कोटी रुपये) पर्यंत वाढविणार आहे. 
- यावेळी मोदी म्हणाले, भारत आणि आशियान देशांची भागिदारी फक्त भारत-प्रशांत महासागरापूर्वीत मर्यादित नाही. तर त्याही पुढे जाऊन शांततेची गँरंटी देणारी आहे.  
- इंडोनेशियात नुकताच चर्चवर हल्ला झाला होता, त्याचा मोदींनी निषेध केला. ते म्हणाले अशा भ्याड हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो. दहशतवादाविरोधात आम्ही इंडोनेशियासोबत आहोत.

 

बातम्या आणखी आहेत...