आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • बलात्कार बलात्कार असतो नरेंद्र मोदी Narendra Modi Says On Kathua And Unnao Case In Bharat Ki Baat Sabke Saath In London

बलात्कार हा बलात्कार असतो, यावर राजकारण करणे चुकीचे: लंडनमध्ये PM मोदींचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तब्बल 4 महिन्यांनी कठुआ प्रकरणावर मोदींनी मौन सोडले. - Divya Marathi
तब्बल 4 महिन्यांनी कठुआ प्रकरणावर मोदींनी मौन सोडले.

लंडन - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील ऐतिहासिक वेस्टमिंस्टर सेंट्रल हॉलमध्ये कठुआ आणि उन्नाव रेपच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, या प्रकारच्या घटनांवर राजकारण नाही झाले पाहिजे. ते म्हणाले की, कल्पनाही करू शकत नाही एखाद्या छोट्या बालिकेवर बलात्कार होतो. किती भयंकर घटना आहे ही! मग आम्ही काय म्हणावं- तुमच्या सत्ताकाळात एवढे बलात्कार व्हायचे आणि आमच्या सत्ताकाळात एवढे कमी आहेत. असं म्हणणं चुकीचं आहे. तथापि, मोदींनी 'भारत की बात सबके साथ' कार्यक्रमात प्रेक्षकांशी तब्बल 2 तास संवाद साधला. सरकारची धोरणे, आरोग्य, सरकारचे कामकाज यासारख्या अनेक मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.

 

सर्व मुलींनाच विचारतात प्रश्न, कधी मुलालाही विचारा  
- नरेंद्र मोदी म्हणाले, “कल्पना करू शकता? एखाद्या छोट्या बालिकेवर बलात्कार होतो, किती भयंकर घटना आहे ही! मग आम्ही काय म्हणावं- तुमच्या सत्ताकाळात एवढे बलात्कार व्हायचे आणि आमच्या सत्ताकाळात एवढे कमी आहेत. असं म्हणणं चुकीचं आहे. बलात्कार-बलात्कार असतो. एका मुलीवर अत्याचार कसा सहन करू शकता?" 
- "मी लालकिल्ल्यावरून हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडला. सर्व प्रश्न मुलींनाच विचारले जातात. कधीतरी मुलांनाही विचारले पाहिजे की, कुठे गेला होतास? हा देशासाठी चिंतेचा विषय आहे. हे पाप करणारा एखाद्याचा मुलगा आहे, त्याच्याही घरी आई आहे." 
- "तुम्ही कल्पना करू शकता की, स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतर भारतात सॅनिटेशनचे कव्हर 35-40 टक्क्यांच्या आसपास होते. गरीब आई शौचासाठी सूर्योदयाच्या आधीच जायची, दिवसा गरज भासली तर संध्याकाळची वाट पाहायची. आपण साधं टॉयलेट नाही बांधू शकत? या प्रश्नाने माझी झोप उडवली. तेव्हा मला वाटले की, मी लाल किल्ल्यावरून आपल्या भावना व्यक्त कराव्यात. मी पाहिले की, देशाने साथ दिली. 3 लाख गावे हागणदारीमुक्त झाली.”

 

मनमोहन यांची मोदींवर टीका; म्हणाले- जे मला सल्ला देतात, त्यांनी स्वत:ही फॉलो करावा
- कठुआ गँगरेप प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही बुधवारी मोदींवर टीका केली. ते म्हणाले- पीएम मोदींनी आता तोच सल्ला पाळला पाहिजे, तो त्यांनी मला दिला होता. त्यांनी नेहमी बोलत राहिले पाहिजे. मनमोहन म्हणाले की, मोदींनी कठुआ प्रकरणावर मौन सोडल्याने आनंद वाटला.

 

काय आहे प्रकरण?
- जम्मू-कश्मिरात कठुआ जिल्ह्यातील रासना गावात बकरवाल समुदायाच्या 8 वर्षीय बालिकेला 10 जानेवारी रोजी किडनॅप करण्यात आले होते. एका आठवड्यानंतर घरापासून काही अंतरावर तिचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या चार्जशीटनुसार, बालिकेची गँगरेपनंतर हत्या करण्यात आली होती. आरोप गावातील एक मंदिरातील सेवादारावर करण्यात आला. असे म्हटले जाते की, बकरवाल समुदायाला गावातून बेदखल करण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आला होता. याप्रकरणी एका अल्पवयीनासहित 8 जणांना आरोपी करण्यात आले. सर्वांना अटक

करण्यात आली आहे. सेशन कोर्ट या केसची 28 एप्रिल रोजी सुनावणी करणार आहे.

 

हेही जरूर वाचा

पाठीवर वार करणा-यांना उत्‍तर देणे मला चांगलेच ठाऊक, सर्जिकल स्‍ट्राइकवर प्रथमच विदेशात बोलले माेदी

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज.. 

बातम्या आणखी आहेत...