आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबू धाबीत मोदी: अमिराती सैनिकांना वाहिली श्रद्धांजली, हिंदू मंदिराची ठेवली कोनशिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबू धाबी - तीन आखाती देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वहात अल-करामा मेमोरियलमध्ये अमिराती सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. याच ठिकाणी त्यांनी पहिल्या हिंदू मंदिराची कोनशिला ठेवली. यापूर्वी पीएम मोदींनी 2015 मध्ये यूएई दौरा केला होता. स्वामीनारायण संस्थेकडून हे मंदिर 55000 स्क्वेअर मीटरवर 2020 पर्यंत उभारले जाणार आहे. अबु धाबीमध्ये हे पहिले हिंदू मंदिर असले तरीही यूएईमध्ये ते दुसरे मंदिर ठरणार आहे. संयुक्त अरब अमिरातच्या दुबई येथे सुद्धा हिंदू मंदिर आहे. रविवारचे कार्यक्रम आटोपल्यानंतर मोदी येथून ओमानला जातील. त्या ठिकाणी 100 वर्षे जुन्या शिवालयाचे दर्शन घेण्यासोबतच मशिदीला सुद्धा भेट देणार आहेत.

 

UAE सरकारने दिली होती मंदिराची जमीन
- 2015 मध्ये मोदी संयुक्त अरब अमिरात येथे पहिल्यांदा आले होते. त्याचवेळी यूएई सरकारने हिंदू मंदिरासाठी जागा देणार अशी घोषणा केली. 
- UAE मध्ये भारताचे राजदूत नवदीप सूरी यांनी सांगितल्याप्रमाणे, हे मंदिर 55000 चौरस मीटरवर उभारले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, संयुक्त अरब अमिरातमध्ये भारतीय वंशाचे 30 लाख नागरिक आहेत. 
- या दौऱ्यात मोदींचे शाही स्वागत करताना त्यांना शनिवारी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. तसेच त्यांच्या स्वागतामध्ये इमारतींना तिरंग्याचा रंग देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...