आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामस्कत - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर असून ते सध्या ओमानमध्ये आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात मोदी सोमवारी येथील 100 वर्षे जुन्या शिव मंदिराची भेट घेणार आहेत. सोबतच ते येथील सुल्तान कबूस मशीदीला देखील भेट देतील. यासह देशातील सर्वच महत्वाच्या सीईओ आणि महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. ओमान आणि भारतात पर्यटन, लष्कर आणि इतर महत्वाचे असे 8 करार झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी रविवारी अबु धाबी येथे हिंदू मंदिराची कोनशिला ठेवली.
मोदी यांचा ओमान दौरा धोरणात्मक संबंधांसाठी महत्वाचा मानला जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्वीट केल्याप्रमाणे, दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठी पीएम मोदींनी सुल्तान कबूस बिन सैद-अल-सैद यांच्यासोबत उच्चस्तरीय चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये उद्योग, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण आणि खाद्य संदर्भात संबंधांना बळकटी देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तीन देशांच्या या दौऱ्यात मोदी सुरुवातीला जॉर्डन, यानंतर पॅलेस्टाइन आणि आता UAE च्या दौऱ्यावर आहेत.
90 पैश्यांत चहा येत नाही आम्ही विमा देतोय...
- ओमान पोहोचताच पीएम मोदींना येथील उप-पंतप्रधान सय्यद फहाद बिन मोहम्मद अल सईद यांनी रिसीव्ह केले. पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यानंतर मोदींनी मस्कत येथील मैदानातून भारतीय समुदायाला संबोधित केले.
- मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात तीन भाषांमध्ये नमस्कार करून केली. यात ते म्हणाले, "मी चहावाला आहे. त्यामुळे, मला माहिती आहे, की 90 पैशांत चहा सुद्धा येत नाही. आम्ही विमा देतोय."
- उल्लेखनीय बाब म्हणजे, स्टेडियमच्या रॉयल बॉक्समधूमन स्पीच देणारे मोदी पहिलेच परदेशी नेते ठरले आहेत. या बॉक्सचा वापर फक्त ओमानचे शाह करतात.
- यासोबतच आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा देखील पीएम मोदींनी ओमानमध्ये वाचला आहे. यापूर्वीच्या सरकारांमध्ये अनेक योजना 30-40 वर्षांपर्यंत लागू होत नव्हत्या. दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी सरदार सरोव्हर डॅमचे उद्घाटन केले होते. गेल्या वर्षी आम्हीच ते काम केले असे मोदी म्हणाले.
- 4 वर्षांत आम्ही देशाला खूप काही दिले. त्यामुळे, कुणीही असे म्हणू शकणार नाही की मोदी किती घेऊन गेले असा दावा त्यांनी केला.
- भाषणाच्या शेवटी त्यांनी सर्वांना भारत माता की जय असा नारा दिला. ते सर्वांना दोन्ही हात वर करून चिअर करत पूर्ण ताकदीने भारत माता की जय म्हणण्याचे आवाहन करत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.