आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाझ-मरियमला अदियाला तुरुंगात मिळाले टीव्ही, फ्रिज; VIP बराकीत काढली रात्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद-  नवाझ व मुलगी मरियमला अदियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांनी व्हीआयपी बराकीत रात्र काढली होती. शनिवारी दोन न्यायमूर्तींच्या पीठासमोर हजर झाले. तेव्हा न्यायालयाने त्यांची बी श्रेणीत रवानगी केली. तेथे त्यांना एसी, फ्रिज, टीव्ही इत्यादी सुविधा मिळाल्या आहेत.

 

भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने नवाझ , मरियम यांना दोषी ठरवताना प्रत्येकी १० व ७ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. दोघेही शुक्रवारी रात्री लंडनहून लाहोरला शरणागतीसाठी परतले. लंडनहून मायदेशी परतले तेव्हा प्रशासनाने शहरात कलम १४४ लागू केले होते. त्यानंतर नवाझ यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखले. तेव्हा धुमश्चक्रीत ५० जण जखमी झाले. शाहबाज यांच्यासह १५०० जणांवर गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...