आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेटफ्लिक्स हाॅलीवूड स्टुडिअाेपेक्षा माेठी कंपनी; यंदा 82 चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात २०१६ च्या सुरुवातीला आलेली नेटफ्लेक्स आज मोठे मार्केट झाली आहे. गेल्या शुक्रवारी तिने सॅक्रेड गेम्स ही पहिली मूळ भारतीय मालिका सुरू केली. ती आठ भागांची आहे. तीत सैफ अली खान व नवाजुद्दीन सिद्दिकी हे मुख्य भूमिकेत आहेत. कंपनी भारतात ७ मालिका सुरू करणार आहे.


डिस्ने १० आणि वॉर्नर ब्रदर्स बनवणार २३ चित्रपट
- ३-४ अब्ज डाॅलर्स जास्त खर्च करत अाहे नेटफ्लिक्स यंदा कंटेंटवर. तसेच या वर्षी कंटेंटमध्ये ८१ हजार काेटी रुपयांची गुंतवणूक करत असून, ती काेणत्याही स्टुडिअाेपेक्षा जास्त अाहे.
- ७०० हून जास्त नवे किंवा एक्सक्लुझिव्ह लायसन्स टीव्ही शाे बनवत अाहे वा त्यांचे हक्क खरेदी केले अाहेत सध्या जगभरात.
- ३० पेक्षा जास्त मूळ चित्रपट बनवले हाेते नेटफ्लिक्सने २०१७ मध्ये- कंपनीचे चीफ कंटेंट अाॅफिसर टेड सॅरेडाॅस यांच्या माहितीनुसार. यंदा ही कंपनी - सुमारे ८२ चित्रपट प्रदर्शित करणार अाहे. तर २०१८ मध्ये डिस्नेचे सुमारे १० व वाॅर्नर ब्रदर्सचे २३ चित्रपट येतील. ब्लमहाऊस ही कंपनीही दरवर्षी सुमारे १० चित्रपट बनवते.
- २१ देशांत कार्यक्रम तयार करत अाहे नेटफ्लिक्स. त्यात दक्षिण काेरिया, ब्राझील व जर्मनीसारख्या देशांचा समावेश अाहे.
- २०११ मध्ये स्ट्रीमिंग व्हिडिअाे सुरू केला हाेता नेटफ्लिक्सने. त्यापूर्वी डीव्हीडी भाड्याने देत होती.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, भारतातील स्थिती...

बातम्या आणखी आहेत...