आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • New Government In Germany; Merkel Elected To Chancellor For The Fourth Time In Six Months After The Election

जर्मनीमध्ये नवे सरकार; मर्केल निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी चौथ्यांदा चान्सलरपदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन- जर्मनीमध्ये सार्वत्रिक निवडणूक सहा महिन्यांपूर्वी पार पडल्या होत्या. मात्र, यामध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळू शकले नाही. त्यामुळे आत्तापर्यंत सरकार स्थापन होऊ शकले नव्हते. अँजेला मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक युनियनने (सीडीयू) यामध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. आता सोशल डेमॉक्रॅट पार्टीच्या सदस्यांनी युतीला मंजुरी दिली आहे. 


बुधवारी कनिष्ठ सभागृहात मर्केल यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यात ७०९ पैकी ३६४ मते त्यांना मिळाली. आवश्यक ५०% मतांपेक्षा ही संख्या ९ ने अधिक आहे. युतीमधील ३५ सदस्यांनी मते दिली नाहीत. विरोधात ३१५ मते पडली. मर्केल यांच्या सीडीयूचे सहकारी पक्ष सीएसयू, एसपीडीला एकूण केवळ ५३.४ % मते मिळाली. युतीला ७०९ 
संसदीय जागांपैकी ३९९ जागांवर यश मिळाले होते. 

 

शरणार्थींच्या समस्येमुळे लोकप्रियतेत घट  
मर्केल यांनी जर्मनीला २००८ च्या मंदीतून बाहेर काढले. मात्र, २०१५ च्या शरणार्थी संकटामुळे लोकप्रियता कमी झाली होती. सप्टेंबर २०१७ च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाची कामगिरी खालावली होती. पूर्ण बहुमत पक्षाने गमावले.  

 

 

२००५ पासून चान्सलरपदी, हा शेवटचा कार्यकाळ असेल 
मर्केल चौथ्यांदा आणि कदाचित अखेरचा कार्यकाळ भूषवत आहेत. त्यांनी संसदेत २०२१ पर्यंत कार्यकाळ पूर्ण केला तर चान्सलर म्हणून १६ वर्षे त्या पूर्ण करतील. त्यांच्यापूर्वी हेल्मुट कोल यांनी इतका काळ जर्मनीचे चान्सलरपद भूषवले होते.

बातम्या आणखी आहेत...