आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगला कामगार आणि शरणार्थींमध्ये रस्सीखेच; रोहिंग्या समस्येमुळे नव्या अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिल रिचर्डसन- म्यानमारमध्ये सैन्य आँग सान स्यू की यांच्या नियंत्रणाबाहेर गेले आहे. अमेरिकेच्या मते, म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांचा वांशिक संहार सुरू आहे. गेल्या १ महिन्यात ६,७०० रोहिंग्या मुस्लिम मारले गेले. देशातून ७ लाख रोहिंग्यांनी पलायन केले. किनारपट्टीवरील राखिनेमध्ये त्यांनी आश्रय घेतला. बांगलादेशाच्या सीमेजवळ हे क्षेत्र आहे. बांगलादेशातील शरणार्थी आता तेथील कामगारांसाठी स्पर्धा निर्माण करत आहेत.


अमेरिकी परराष्ट्रमंत्री रेक्स टिलर्सन यांच्या मते, ही स्थिती आणखी वाईट होण्याची शक्यता आहे. स्यू की कोणतीही नैतिक जबाबदारी घेण्यास पुढे येत नाहीत. त्या कोणाचा सल्लाही एेकत नाहीत. त्यामुळे पाश्चात्त्य जग मदत करू शकत नाही. म्यानमारमध्ये कोणतीही मदत करणे सध्या तरी शक्य दिसत नाही.


म्यानमारमध्ये कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी खुप संतुलन साधावे लागेल. पाश्चात्त्य देशांना बांगलादेश सीमा क्षेत्रात मदत पोहोचवणे शक्य आहे. बांगलादेशात हजारो रोहिंग्यांनी आश्रय घेतला आहे. याला इतके सरळ मानता येणार नाही. आता शरणार्थी व मूळचे बांगलादेशी यांच्यादरम्यान तणावाची स्थिती आहे. अकुशल कामगारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांदरम्यान स्पर्धा निर्माण झाली. हेच तणावाचे कारण आहे. बांगलादेश सरकारवरही तणाव आहे. रोहिंग्याना त्यांच्या मूळ देशात पाठवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.


पाश्चात्त्य देशांकडून त्यांना आशा आहेत. म्यानमारवर दबाव टाकण्यासाठी सैन्य अधिकाऱ्यांवर काही निर्बंध लादावेत. येथे मानवाधिकारांची पायमल्ली होत आहे. मानवाधिकार संघटना व मदत करणाऱ्या देशांनी येथे थांबावे. म्यानमार त्यांच्या सुरक्षित परतीवर शिक्कामोर्तब करेपर्यंत पाठपुराव्याची मागणी शरणार्थी करत आहेत. दडपशाहीचा विरोध करत सत्तेत आलेल्या आँग सान स्यू की यांच्या देशात हे सुरू आहे. अमेरिका मानवाधिकार उल्लंघन व सामूहिक कब्रस्तानाची चौकशी करू शकतो. आंतरराष्ट्रीय समुदायाला राखिनेमध्ये बौद्ध व रोहिंग्यांदरम्यान समेट घडवून आणावा लागेल.


काही शरणार्थी म्यानमारला परतू इच्छित नाहीत. त्यामुळे त्यांना बांगलादेशातच वसवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बांगलादेशातील राजकीय परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे रोहिंग्यांना सामावून घेणे त्यांच्यासाठीदेखील जिकिरीचे आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाचे मत आहे की, रोहिंग्यांना मूलभूत अधिकार बांगलादेशात मिळावेत. त्यांना कामाचा परवाना देण्यात यावा. स्थिती कधीही स्फोटक होऊ शकते. राखिनेमध्ये असलेले रोहिंग्यादेखील शरणार्थी होण्याची शक्यता आहे. कचिन व शान राज्यांमध्ये तणाव आहे. राखिनेमध्ये तणाव असून हिंसा भडकण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...