आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाईमध्ये घबराट असताना ट्रम्प गोल्फमध्ये मश्गूल! चुकीच्‍या इशाऱ्यामुळे शहरात गोंधळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवाई- अमेरिकेतील १५ लाख लोकसंख्या असलेले शहर हवाईत लोकांच्या फोनवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा संदेश आला होता. ‘शहरावर क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. हा लष्करी सराव नव्हे. लोकांनी तत्काळ सुरक्षित स्थळी जावे’ असा तो संदेश होता. त्यानंतर काही क्षणांतच शहरात गोंधळ उडाला. परंतु त्या वेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळण्यात मग्न होते. हवाईतील लोकांना अशा प्रकारचा संदेश देण्यात आल्याची ट्रम्प यांना कल्पनाही नव्हती. ते आपल्या फ्लोरिडातील फार्महाऊसवर गोल्फ खेळत होते. त्यांची गोल्फची फेरी संपण्यापूर्वीच आणीबाणीसंबंधीच्या व्यवस्थापन संस्थेने ट्विट करून लाेकांना बातमी चुकीची असल्याचे स्पष्ट करून दिलासा दिला होता. त्यामुळे क्षेपणास्त्र हल्ला होणार नाही, हे स्पष्ट झाले. 


संस्थेच्या एका कर्मचाऱ्याने चुकीने हे बटण दाबले होतेे. फोनवर हा संदेश आल्यानंतर टीव्ही व रेडिआेवरदेखील ही बातमी झळकली होती. एकूण ३८ मिनिटांपर्यंत शहरात गाेंधळाची स्थिती होती. लोकांनी नातेवाइकांना भावनिक संदेशदेखील पाठवले होते. मात्र काही वेळाने ट्विट व इतर संदेशातून खरी परिस्थिती सर्वांच्या लक्षात आली. इशारा देणारा संदेश १ वाजून ९ मिनिटांनी लोकांच्या फोनवर आला. ट्रम्प १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत गोल्फवर होते. संदेश चुकीचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लोकांनी ट्विटरवर ट्रम्प यांची चांगली टर उडवली. ट्रम्प यांनी गोल्फच खेळत राहावे असे आम्हाला वाटते, असा टोला एका युजरने लगावला. आम्हाला त्यांच्याकडून फारशी अपेक्षा नाही. मात्र त्यांनी १० सेकंदांसाठी खेळ थांबवून एखादे ट्विट केले असते तर बरे झाले असते. ट्रम्प यांनी खेळून झाल्यानंतरही या घटनेवर प्रतिक्रिया दिली नाही. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, इकडे इशारा आला होता...   

बातम्या आणखी आहेत...