आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमची वाढती लष्करी ताकद कोणासाठी धोका नाही, चीनचे स्‍पष्‍टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनच्या विकासामुळे दुसऱ्या कुठल्याही देशाला धोका नाही, असे चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसचे (एनपीसी) प्रवक्ता झांग येसुई यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, चीनने अलीकडच्या काही वर्षांत प्रथमच संसदेच्या वार्षिक अधिवेशनाच्या आधी संरक्षण अर्थसंकल्पाची औपचारिक घोषणा केली नाही. चीनमध्ये साधारणत: दरवर्षी संसदेचे अधिवेशन सुरू होण्याआधी एनपीसीचे प्रवक्ता संरक्षण अर्थसंकल्पाची घोषणा करतात आणि किती टक्के वाढ झाली याची माहिती देतात.  


माजी उप परराष्ट्रमंत्री झांग म्हणाले की, चीनच्या उदयासोबत लष्कर शक्तिशाली होत आहे. चीन नेहमीच शांततापूर्ण विकास मार्गाचे पालन करेल. आमची संरक्षण धोरण बचावासाठी आहे. आमचे लष्कर शक्तिशाली झाल्यामुळे कोणत्याही देशाला धोका नाही.  चीनने गेल्या वर्षी ९.८१ लाख कोटी रुपयांच्या (१५०.५ अब्ज डॉलर) संरक्षण अर्थसंकल्पाची घोषणा केली होती.

बातम्या आणखी आहेत...