आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकिंग म्हणत, ब्रह्मांडाचे रहस्य सोपे; पण महिला मोठे रहस्य !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- जगप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी रिलेटिव्हिटी, ब्लॅक होल, बिग बँग थिअरी समजावून सांगण्यात मोठी भूमिका वठवली होती. त्यांनी आपल्या योगदानातून जगभरातील कोट्यवधी तरुणांना विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले. हॉकिंग यांच्या शरीराचे अनेक भाग असाध्य आजाराने निकामी झाले होते. असे असूनही त्यांनी कधीही हार मानली नाही. विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी नवनवीन शोध लावले. दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यावर माणूस काहीही साध्य करू शकतो, हेच हॉकिंग यांनी दाखवून दिले. हॉकिंग यांचे दोन विवाह झाले होते. दोन्हीही अयशस्वी ठरले. दुसरी पत्नी मेसनने त्यांच्यावर छळाचा आरोप केला होता. पोलिसांत तक्रार केली. तपासात मेसन यांनी ढिलाई दाखवल्याने हॉकिंग यांची सुटका झाली. महिला या एक प्रकारच्या रहस्य असतात, असे त्यांनी काही वर्षांनंतर म्हटले होते.


हॉकिंग शिक्षकास म्हणाले, प्रथम श्रेणीची पदवी देत असाल तरच पीएचडी
हॉकिंग यांच्या महाविद्यालयीन जीवनातील हा किस्सा. ऑक्सफर्डमध्ये शिकताना त्यांनी केवळ १ हजार दिवसच काम केले. त्यावरून अध्यापकांकडून त्यांना आेरडा ऐकावा लागला होता. परंतु त्यांची गुणवत्ता पाहून त्यांना प्रथम श्रेणी द्यावी की द्वितीय यावरून शिक्षक संभ्रमात होते. त्यावर हॉकिंग म्हणाले, मला प्रथम श्रेणी दिली तरच मी केम्ब्रिजमध्ये पीएच.डी. करेन. पुढे शिक्षकाने त्यांना प्रथम श्रेणीची पदवी दिली. हा किस्सा नेहमीच चर्चिला जातो. 


संशोधनाच्या शेवटी लिहिले- घड्याळास मागे फिरवणे शक्य नाही
हॉकिंग यांना वेळेचा अपव्यय मुळीच आवडत नसे. त्यांनी वेळेत संशोधन पूर्ण केले होते. घड्याळास मागे फिरवणे अशक्य असल्याचे भाष्य करून त्यांनी संशोधनाचा शेवट केला होता. गेलेली वेळ पुन्हा आणता येत नाही, असा त्यांचा संदेश होता. माझा मेंदू सतत सक्रिय असतो. ते माझ्या अस्तित्वाचे कारण ठरले आणि माझ्यातील विनोदबुद्धीही कायम राहिली. अन्यथा जीवन अतिशय कंटाळवाणे झाले असते, असे हॉकिंग म्हणाले होते.

 

गाझावरील इस्रायली ताब्याच्या विरोधात इस्रायलला जाण्यास मनाई
हॉकिंग यांनी पर्यावरणाच्या दुर्दशेवर नेहमीच कठोर शब्दांत मते व्यक्त केली होती. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेण्यासाठी जगाला इशारा दिला. राजकीयदृष्ट्या सजग हॉकिंग यांनी पॅलेस्टाइनच्या बाजूने सहानुभूती दाखवली आणि गाझावरील इस्रायलच्या ताब्यास विरोध केला होता. २०१३ मधील एका परिसंवादात त्यांनी इस्रायलने तेथे जाणे अयोग्य असल्याचे म्हटले होते. त्याशिवाय अमेरिकेने व्हिएतनामविरोधात युद्ध छेडले तेव्हाही हॉकिंग यांनी विरोधात भूमिका मांडली होती.

 

आजाराबद्दल म्हणाले- मृत्यूच्या भीतीने मला दिली जगण्याची प्रेरणा
हॉकिंग यांचा जगभरातील अनेक पुरस्कारांनी गौरव झाला होता. नोबेल मात्र दूर राहिले. मोटर न्यूरॉन हा दुर्मिळ आजार होण्यापूर्वी जीवन कंटाळवाणे झाले होते. परंतु मृत्यूच्या भीतीने जीवन जगले पाहिजे, याची जाणीव झाली. मी काहीतरी केले पाहिजे. माणसाच्या ज्ञानाला समर्थ करण्यामध्ये मी छोटे योगदान दिले याचा मला अभिमान वाटतो, असे स्टीफन हॉकिंग यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 

 

चित्रपट : हाॅकिंग हे ‘जॅग्वार’ ब्रँडच्या एका कारच्या टीव्ही जाहिरातीहीे हाेते. तसेच टीव्ही मालिका व काही चित्रपटांतही त्यांनी काम केले. १९८७चा ‘स्टार ट्रेक : द नेक्स्ट जनरेशन’, ‘फ्यूचर्मा’ व ‘द बिग बँग थेअरी’ हे ते चित्रपट हाेते.  


स्वप्न : हाॅकिंग यांची एक टाइम मशीन बनवण्याची इच्छा हाेती. माझ्याकडे टाइम मशीन असती, तर मी हाॅलीवूडची साैंदर्यवती अभिनेत्री मर्लिन मुन्राे व संशाेधक न्यूटन यांना भेटायला गेलाे असताे, असे त्यांनी एकदा म्हटले हाेते.  


नास्तिक : स्टीफन हाॅकिंग यांनी अापले पुस्तक ‘द ग्रँड डिझाइन’मध्ये ईश्वराचे अस्तित्व नाकारले अाहे. अंधारापासून बचावासाठी स्वर्गाच्या कथा रचल्या गेल्या अाहेत. मानवी मेंदू एक संगणक असून अवयव खराब झाल्यानंतर तो बंद  होतो. 


इशारा : हाॅकिंग म्हणाले हाेते की, मनुष्यप्राण्यांनी स्वत:चे अस्तित्व राखण्यासाठी पुढील १०० वर्षांत अशी तयारी करावी, ज्यामुळे पृथ्वी सहजपणे साेडली जाऊ शकेल. प्रदूषणामुळे पृथ्वी अागीचा गाेळा बनतेय, हे अापण जाणताेच. 


पुढील स्‍लाइडवर पाहा,  ब्रह्मांडाहून माेठे व पुरातन काहीही नाही; त्यास पूर्णपणे समजणे हेच माझे ध्येय... 

बातम्या आणखी आहेत...