आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदी लंडनमध्येच! Jewellery Shop वरच्या फ्लॅटला केले घर, पासपोर्ट नसतानाही 4 परदेश दौरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - पंजाब नॅशनल बँकेला 13,600 कोटींचा चुना लावून पसार झालेला नीरव मोदी लंडनमध्येच राहतो आहे. त्याने आपल्या लंडनच्या ज्वेलरी शॉपवर असलेल्या एका फ्लॅटला घर केले आहे. द संडे टाइम्सच्या एका वृत्तानुसार, भारताने नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केल्याचा दावा केला. तरीही तो 4 वेळा ब्रिटनमधून बाहेर जाऊन आला आहे. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले आहेत. सीबीआयने इंटरपोलला नीरव मोदी विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याचे अपील सुद्धा केले आहे.


द संडे टाइम्सने रिपोर्टमध्ये लिहिले की नीरव पोस्ट मेफेअर परिसरात आपल्या 'नीरव मोदी' ज्वेलरी शॉपवर असलेल्या एका फ्लॅटमध्ये राहत आहे. गेल्या आठवड्यात हे शॉप बंद करण्यात आले होते. रिपोर्टनुसार, एका भारतीय अधिकाऱ्याचा दाखला देण्यात आला आहे. अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले, ब्रिटनमध्ये असेच लोक का येतात. ब्रिटन अशा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थळ बनले आहे का? नीरव ब्रिटेनचा तसाच वापर करत आहे. तसेच तो भारत आणि ब्रिटनच्या मैत्री संबंधांना खराब करण्याची धमकी देत आहे. 


हाँगकाँग, न्यूयॉर्कसह पॅरिसला गेला होता नीरव
23 फेब्रुवारी रोजी भारताने मोदीचा पासपोर्ट जप्त केला असा दावा केला होता. यानंतर इंटरपोल आणि ब्रिटिश सरकारशी सुद्धा संवाद साधला. रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे, की नीरव हीथ्रो एअरपोर्टवरून 15 मार्च रोजी हाँगकाँगला गेला होता. 28 मार्च रोजी तो त्याच विमानतळावरून न्यूयॉर्क आणि तीन दिवसांनंतर लंडन ते पॅरिस गेला होता. 12 जून रोजी त्याने लंडन ते ब्रसेल्स असा युरोस्टार रेल्वे प्रवास केला.


ईमेलने पाठवला अटक वॉरंट
महसूल विभागातील गुप्तचर खात्याने (DRI) नीरव मोदीला कस्टम ड्युटी चुकवल्याप्रकरणी ईमेल मार्फत अटक वॉरंट पाठवला आहे. एजंसीने मार्चमध्ये नीरवला आणि त्याच्या तीन कंपन्यांविरोधात खटला दाखल केला होता. 

बातम्या आणखी आहेत...