आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुकूमशहा किमने आर्मी ऑफिसरला दिला मृत्युदंड, जवानांमध्ये जास्त अन्न- इंधन वाटले म्हणून 90 गोळ्या झाडून शरीराची चाळणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल - उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन याने आपल्या एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याला जाहीर शिक्षा देऊन 90 गोळ्या झाडायला लावल्या. किमने याची जबाबदारी 9 जणांवर सोपवली, ज्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. लेफ्टनंट जनरल ह्योंग जू-सोंगवर जवानांना निश्चित प्रमाणापेक्षा जास्त अन्न आणि इंधन वाटल्याचे आरोप होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना अधिकारांचा चुकीचा वापर करणे आणि देशद्रोहाचा आरोपी ठरवण्यात आले होते. यापूर्वीही किमने मीटिंगमध्ये डुलकी घेणाऱ्या आपल्या संरक्षण प्रमुख ह्योंग योंग यांनाही मृत्युदंड ठोठावला होता.

द सन वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, सैन्य अधिकाऱ्याला राजधानी प्योंगयोंग येथील मिलिटरी अकॅडमीमध्ये सजा-ए-मौत देण्यात आली. ह्योंगने 10 एप्रिल रोजी एका सॅटेलाइट लॉन्चिंग स्टेशनचे निरीक्षण केले होते. ते म्हणाले होते की, आता अण्वस्त्रे आणि रॉकेट बनवण्यासाठी आम्ही उपाशी राहू शकत नाही. तेव्हा सैन्याच्या या अधिकाऱ्याने जवानांच्या कुटुंबीयांसाठी जास्त तांदूळ आणि इंधन वाटण्याचे निर्देश दिले होते. यानंतर हुकूमशहाला ह्योंगची ही बाब खटकली, किमच्या आदेशावरून अधिकाऱ्याला मृत्युदंड देण्यात आला.  

बातम्या आणखी आहेत...