आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला करू शकतो NKorea, प्रत्युत्तर दिल्यास शेजारील देशांचे अधिक नुकसान!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - जगातील सर्वात एक्कलकोंडा राष्ट्र उत्तर कोरिया अमेरिकेवर खरोखर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत आहे. हा हल्ला येत्या काही महिन्यात केला जाऊ शकतो असा गंभीर इशारा अमेरिकेच्या सर्वोच्च गुप्तचर संस्था सीआयएने दिला आहे. सीआयए संचालक माइक पॉम्पियो यांनी सांगितल्याप्रमाणे, नॉर्थ कोरियाकडे अमेरिकेपर्यंत मारा करू शकणारे क्षेपणास्त्र असण्याची दाट शक्यता आहे. 

 

- अमेरिकेला उत्तर कोरियापासून असलेल्या संकटावर सीआयएमध्ये नेहमीच चर्चा केली जाते. पण, यावेळी हल्ल्याच्या शक्यतेवर गांभीर्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
- उल्लेखनीय बाब म्हणजे, उत्तर कोरियाने 2017 मध्ये 20 हून अधिक वेळा बॅलिस्टिक मिसाइल टेस्ट घेतले आहेत. 
- एवढेच नव्हे, तर 2018 च्या सुरुवातीला उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता किम जोंग उनने आपल्या देशाला आतापर्यंतची सर्वात शक्तीशाली मिसाइल बनवण्याचे आदेश दिले होते. 
- माइक पॉम्पियो यांनी सांगितल्याप्रमाणे, उत्तर कोरियाला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने कारवाई केली. तरीही ती कारवाई उत्तर कोरियापेक्षा जपान आणि दक्षिण कोरियासाठी घातक ठरेल. 
- उत्तर कोरियाचा सुप्रीम लीडर किम जोंग उनला संपवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. अमेरिकेकडे ते करून दाखवण्याची कुंवत आहे असा धमकीवजा इशारा देखील त्यांनी दिला. 

बातम्या आणखी आहेत...