आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर कोरिया बंद करणार अणुचाचणी केंद्र, किमच्या दौऱ्यानंतर दक्षिण कोरियाचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-ऊन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन यांच्यात दोन दिवसांपूर्वी ऐतिहासिक भेट झाली होती. (फाइल) - Divya Marathi
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-ऊन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन यांच्यात दोन दिवसांपूर्वी ऐतिहासिक भेट झाली होती. (फाइल)

- शुक्रवारी किम जोंग-ऊन प्रथमच बॉर्डर ओलांडून दक्षिण कोरियाला गेले होते. 

- त्यापूर्वी उत्तर कोरियाच्या इतिहासातील एकही हुकूमशहा दक्षिण कोरियात गेलेला नाही. 

 

सेऊल - नॉर्थ कोरिया पुढच्या महिन्यात म्हणजे मे मध्ये त्यांचे अणुचाचणी केंद्र बंद करणार आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन यांच्या कार्यालयाने रविवारी याबाबत माहिती दिली. कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे की, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-ऊन यांनी समिटदरम्यान साइट बंद करणार असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे शुक्रवारीच किम जोंग-उन आणि मून जे-इन यांची दक्षिण कोरियात ऐतिहासिक भेट झाली होती. 


खराब झाले आहे उत्तर कोरियातील अणु चाचणी केंद्र 
उत्तर कोरियातील या अणुचाचणी केंद्राची कोणालाही फारशी माहिती नाही. पण उत्तर कोरियातील तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, या टेस्ट साइटवर दीर्घ काळापासून चाचण्या केल्या जात आहेत. 2006 पासून आतापर्यंत येथे 6 वेळा अणुचाचणी झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये चाचणीसनंतर ही साइट काहीही कामाची राहिलेली नाही. येथील जमिनीला भेगा पडल्या आहेत. याठिकाणी आता जास्त अणुचाचण्या करता येणे शक्य नाही. 


उत्तर कोरिया-दक्षिण कोरियात झालेले करा... 
- कोरियन द्वीपसमूह अण्वस्र मुक्त केले जाईल. 
- सामेवर शांतता नांदवण्यासाठी आर्मी झोनला शांतता झोन बनवणार. 
- दोन्ही देशांच्या सीमांमुळे विभक्त झालेल्या कुटुंबीयांना भेटवणार. 
- शत्रुत्वामुळे होणाऱ्या सर्व कारवाया बंद करणार 
- दोन्ही देशांमध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणार. 

 

बातम्या आणखी आहेत...