आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • किम आता द. कोरियाशी जुळवणार आपल्या देशाची वेळ North Korea Will Move Its Clocks 30 Minutes Forward To Unify With The South Korea Time

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किम आता द. कोरियाशी जुळवणार आपल्या देशाची वेळ, 5 मेपासून अर्धा तास पुढे होतील उ. कोरियाची घड्याळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- 2015 मध्ये दोन्ही देशांनी वेगवेगळे टाइम झोन बनवले होते.

- किम जेव्हा द. कोरियात आला होता, तेव्हा भिंतीवर दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या घड्याळी पाहून त्यांना खूप दु:ख झाले.

 

सेऊल - उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियादरम्यान मैत्री मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता उत्तर कोरियाने घोषणा केली आहे की, ते दक्षिण कोरियाच्या टाइम झोनच्या हिशेबाने वेळ मिळवण्यासाठी आपल्या देशातील घड्याळे मिनिटे करेल. 27 एप्रिल रोजी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांनी पहिल्यांदा एकमेकांचे हात हातात घेऊन बातचीत केली. दोन्ही नेते बॉर्डरवर बनलेल्या डिमिलिट्राइज्ड झोन (असैन्य क्षेत्र) मध्ये तब्बल 28 सेकंद हस्तांदोलन करत राहिले. यासोबतच दोन्ही देशांतील 65 वर्षांपासून सुरू असलेली कटुता संपली. नंतर तब्बल अडीच तास सुरू असलेल्या चर्चेनंतर दोन्ही देश शांतता करारासाठी तयार झाले.


2015 मध्ये बदलले होते टाइम झोन
- 2015 मध्ये दोन्ही देशांनी वेगवेगळे टाइम झोन बनवले होते. उत्तर कोरियाने आपली प्रमाणवेळ दक्षिण कोरियापेक्षा 30 मिनिटे मागे केली होती.
- उत्तर कोरियाने हे राष्ट्रीयत्वाअंतर्गत करण्यात येणारे काम असल्याचे घोषित केले. म्हटले की, नवा टाइम झोन उपनिवेश काळाच्या आधी उत्तर कोरियात होता. तथापि, 1910-45 पर्यंत उत्तर कोरिया, जपानच्या अधिकारात होते.
- केसीएनएचे म्हणणे आहे की, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उनने दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांसोबत ऐतिहासिक भेटीत वचन दिले आहे की, ते आपल्या देशाची प्रमाणवेळ साऊथ कोरियाबरोबर आणतील.   

बातम्या आणखी आहेत...