आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॅरिस - फ्रान्समध्ये एक मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार हॉलीवूड चित्रपटांप्रमाणे जेलमधून हेलिकॉप्टरमध्ये स्वार होऊन फरार झाला. 46 वर्षीय गुन्हेगार रेडोइन फेड हा पॅरिसच्या दक्षिण-पूर्वेत असलेल्या रियू जेलमध्ये कैदेत होता. रविवार सकाळी तो तुरुंग फोडून पळाला आणि काही शस्त्रधारी लोकांच्या मदतीने फरार होण्यात यशस्वी ठरला. त्याने तुरुंग कसे फोडले हेसुद्धा अजूनपर्यंत पोलिसांना कळालेले नाही. त्याचे मदत करणारे कोण होते, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. रेडोइन याला 2010 मध्ये चोरी आणि एक महिला पोलिसाच्या हत्येप्रकरणी 25 वर्षांच्या कैदेची शिक्षा झालेली आहे.
रेडोइन फेड याने पूर्वीही तुरुंग फोडलेला आहे.
अधिकारी म्हणाले की, रेडोइन 5 वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये एका तुरुंगात बंद होता. तेव्हा त्याने जेलमध्ये डायनामाइट ब्लास्ट करून 6 पोलिस कर्मचाऱ्यांना बंधक बनवले होते. यानंतर तो फरार झाला होता. तथापि, पोलिसांनी 6 आठवड्यांपर्यंत चाललेल्या तपासानंतर शोधून काढले होते.
हेलिकॉप्टर जप्त:
पोलिस ऑफिसर म्हणाले की, त्याने पळून जाण्यासाठी वापरलेले हेलिकॉप्टर पॅरिसमधून जप्त करण्यात आले आहे. तथापि, पोलिसांना फरार झालेल्या फेडचा कोणताही सुगावा लागला नाही. फेड फ्रान्समधी कुख्यात चोर आहे. त्याच्या चोरीचे किस्से जाणून घेण्यासाठी अनेक वेळा अनेक चॅनल्सनी इंटरव्ह्यूसाठी बोलावलेले होते. त्याने आपल्या गुन्ह्यांवर 2 पुस्तकेही लिहिली आहे.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.