आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांसमोर स्कर्ट उचलत होती ही तरुणी, सांगितले हे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - रशियातील एका तरुणाने सार्वजनिक ठिकाणी जाऊन अजब पद्धतीने आंदोलन केले. लाल कपड्यांमध्ये रेल्वे स्टेशनवर जाऊन ही तरुणी सर्वांसमोर आपले स्कर्ट वर उचलत होती. लोकांसमोर वारंवार ती असेच करत असल्याचे पाहता अनेकांनी मान खाली केली. तर काहींना इतकी सुंदर तरुणी असे का बरे करत असेल? असा प्रश्न पडला होता. ते आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. 

 

सांगितले हे कारण...
>> Anna Dovgalyuk असे या तरुणीचे नाव असून ती भर स्टेशनवर लोकांसमोर जाऊन आपले स्कर्ट वर करत होती. ती प्रामुख्याने कॅमेऱ्याकडे पाहून तसे करत होती असे लोकांच्या लक्षात आले. माध्यमांशी संवाद साधताना तिने हा आपला विरोध असल्याचे सांगितले.
>> अॅनाने सांगितल्याप्रमाणे, सार्वजनिक ठिकाणी छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी महिलांना आता स्कर्ट घालण्याची देखील भिती वाटते. स्कर्ट पाहताच लोक त्यांच्याकडे पाहून अश्लील कॉमेंट करतात. स्मार्टफोन आणि कॅमेऱ्याने लपून स्कर्ट घालचे फोटो काढतात. हा एक गंभीर प्रकारचे गुन्हा आहे.
>> अशाच घटनांचा विरोध करण्यासाठी आणि अपस्कर्ट फोटो टिपणाऱ्या समाजकंटकांना कठोर शिक्षा व्हावी ही तिची मागणी होती. सार्वजनिक ठिकाणी असे करून आपण लोकांचे लक्ष वेधले आणि मग साऱ्या जगासमोर आपल्या आणि आपल्यासारख्याच अनेकींच्या वेदना मांडल्या असे ती म्हणते. 
>> सबवे स्टेशन, रेल्वे आणि बस स्थानक तसेच व्यस्त रस्ते, गार्डन इत्यादी ठिकाणी तिने जाऊन तसेच करून लोकांचे लक्ष वेधले. अपस्कर्ट फोटो काढणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी. या प्रकरणांना गंभीर गुन्ह्यांमध्ये वर्गीकृत करावे अशी मागणी ती करत आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, तिने अशा प्रकारे व्यक्त केला विरोध...

बातम्या आणखी आहेत...