आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: हनिमून साजरा करण्यासाठी हे हॉटेल देतेय 70 लाखांचे बक्षीस, अट फक्त एवढीच!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क- लग्न झालं की नवदांपत्याला वेध लागतात ते हनीमूनचे! मधुचंद्रासाठी स्वप्नवत जागेवर जाणं हे सर्वांची इच्छा असते. प्रत्येक लग्न करणारं कपल हे त्यांच्या हनीमूनसाठी उत्सुक असतं. त्याची प्लॅनिंगही त्यांनी केलेली असते. 

 

OMG ऑफर!

परंतु एक ठिकाण असे आहे जेथे तुम्ही हनिमून साजरा केल्यावर उलट तुम्हालाच पैसे मिळतात, तेही थोडेथोडके नव्हे तर तब्बल 70 लाख! त्यासाठी फक्त एक अट आहे. विश्वास बसत नाही ना! पण हे खरंय...

आम्ही ज्या हॉटेलबद्दल सांगत आहोत, त्या हॉटेलद्वारे तुम्हाला हनीमून करण्यासाठी 70 लाख रुपये दिले जात आहेत. पण त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. इस्रायलचं हे प्रसिद्ध हॉटेल येहदा येथे आहे. त्यांनी ग्राहकांसाठी ही विशेष ऑफर सुरू केली आहे. येथे जर तुम्ही हनिमूनला गेला, तर हनिमूनसोबतच तुम्हाला 70 लाख रुपयेही मिळतील.

 

अशी आहे अट...
येह्दामधील या हॉटेलनुसार, हॉटेलमध्ये आलेल्या कपलमधील विवाहित महिला जर हॉटेलने दिलेल्या तारखेनुसार प्रेग्नंट राहिल्या, तर त्या दांपत्याला ७० लाख रुपयांचं बक्षीस आणि हॉटेलचा सर्व खर्च माफ केला जाईल. 

 

डॉक्टरांची टीम करते तपासणी
जर एखाद्या महिलेने दावा केला की, ती प्रेग्नेंट आहे तर हॉटेलमधील डॉक्टरांची टीम तिची तपासणी करते. तपासणीत सत्यता आढळली तर 70 लाख रुपयांची रक्कम त्या जोडप्याला दिली जाते. सोबतच हॉटेलचा सगळा खर्चही माफ केला जातो. 

 

दर 4 वर्षांनी येते ऑफर
ही ऑफर दर 4 वर्षांनी दिली जाते. हॉटेल लीप इयरच्या दिवसांत ही ऑफर ठेवते. त्यामुळे कपल्स 29 फेब्रुवारीला येतात आणि हॉटेलमध्येच राहतात. या ऑफरमुळे इथे मोठी गर्दी पाहायला मिळते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...   

 

बातम्या आणखी आहेत...