आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एव्हरेस्टवर 65 वर्षांत आतापर्यंत फक्त 356 महिला पोहोचल्या; इतिहासातील ही सर्वाधिक संख्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

  काठमांडू - हे छायाचित्र जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पचे आहे. येथे काही दिवसांपासून जगभरातील गिर्यारोहक एकत्र येत आहेत. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या एव्हरेस्ट एक्सपिडिशन परमिटसाठी त्यांनी अर्ज केला आहे. नेपाळ पर्यटन विभागाने आतापर्यंत ३४६ जणांना परवाना दिला आहे. यामध्ये विक्रमी ६० महिला आहेत.

 

हा इतिहासात महिलांचा सर्वात मोठा गट आहे. नेपाळ पर्यटन विभागानुसार,अलीकडच्या वर्षांत जगभरातील महिला गिर्यारोहकांत एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा वाढत आहे. गेल्या वर्षी विक्रमी ३३ महिला गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले होते. या वर्षी ६० महिलांना परवाना मिळाला आहे. पुढील यादीत महिलांची डझनभर नावे असू शकतात. तिबेटकडून १८० जण चढाई करतील. यामध्ये २५ पेक्षा जास्त महिला आहेत. म्हणजे १०० पेक्षा जास्त महिला भाग घेत आहेत.

 

६५ वर्षांत ३५६ महिला व ३,१९५ पुरुष एव्हरेस्ट शिखरापर्यंत पोहोचू शकले  
* नेपाळ माउंटेनियअरिंग असोसिएशननुसार, १९७५ मध्ये जपानच्या जुनको शिखर सर करणारी पहिली महिला ठरली होती. तेव्हापासून ३५६ महिलांनी मोहीम फत्ते केली.  
* केवळ ५ नेपाळी युवकांना, तर १५ नेपाळी महिलांना परवाना मिळाला आहे. नेपाळी महिलांचा सर्वात मोठा गट २००८ मध्ये १० लाेकांचा होता.  
* आतापर्यंत ३,१९५ पुरुष एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये १३५ नेपाळी आहेत. किती महिला व पुरुषांनी एव्हरेस्टवर चढाईचा प्रयत्न केला याची माहिती उपलब्ध नाही.

 

नेपाळच्या ५ महिला पत्रकारही या एक्सपीडिशनमध्ये जात आहेत. यामध्ये शर्मिला श्रेष्ठा एक आहेत. त्या एव्हरेस्टवर जाणाऱ्या महिलांचे हसरे चेहरे टिपतात व त्याचे प्रदर्शन भरवतात. या वेळी त्या पूर्ण मोहिमेत महिलांची छायाचित्रे काढतील व त्याचे प्रदर्शन भरवतील.  

 

नेपाळला २८ कोटींचे उत्पन्न परवान्याद्वारे  
या गिर्यारोहकांना नेपाळचे गाइड रस्ता दाखवतील. ७०० जण ८,८४८ मीटर उंच शिखर फत्ते करतील. विदेशी नागरिकांसाठी परवाना शुल्क ७ लाख रुपये आहे. याद्वारे नेपाळला २८ कोटी रुपये मिळतील.  

 

 

बातम्या आणखी आहेत...