आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधव यांच्याविरुद्ध दहशतवाद, तोडफोडीचाही खटला दाखल;पाकिस्तानने सुनावली आहे फाशीची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यावर दहशतवाद, तोडफोड केल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने अधिकाऱ्यांचा संदर्भ देत ही माहिती दिली आहे. ४७ वर्षीय जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप केला होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पाकच्या लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताच्या अपिलानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या शिक्षेवर रोख लावली आहे.  


डॉनच्या वृत्तानुसार, जाधव यांच्याविरुद्ध अनेक खटले सुरु आहेत. दहशतवाद, तोडफोड केल्याचे आरोप आहेत. यापैकी केवळ हेरगिरी प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. इतर खटल्यांची सुनावणी सुरु आहे.  


पाकिस्तानला जाधव यांच्या हँडलरपर्यंत पोहोचायचे आहे. नौदलातील सेवेची फाइल, पेन्शन, बँक रेकॉर्ड पाकने भारताकडे मागितले होते. मुबारक हुसैन पटेलच्या नावाने जारी पासपोर्टच्या विषयी माहिती देखील भारताकडे मागण्यात आली होती. या नावाने पासपोर्ट कसा देण्यात आला, असा पाकचा प्रश्न आहे. पटेल या नावाने मुंबई, पुणे, महाराष्ट्रात खरेदी केलेल्या संपत्तीचा तपशील पाकने मागितला आहे. 


सध्या हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात सुरु आहे. जाधव यांच्यापर्यंत राजनयिक पोहोच द्यावी, अशी भारताची मागणी आहे.  

 

परवानगी नाकारली
पाकला जाधव प्रकरणी १३ भारतीय अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची इच्छा आहे. मात्र भारताने सहकार्य करण्याची तयारी दाखवली नाही. या अधिकाऱ्यांच्या नावाचा खुलासा पाकने केलेला नाही. जाधव यांचे पेन्शन रेकॉर्ड, पासपोर्ट, संपत्तीसंबंधी तपशील पाकला हवा आहे.

 

 

पाकला करायची आहे भारताच्या 13 अधिकाऱ्यांची चौकशी 

- हा अधिकारी म्हणाला की, जाधव यांच्या विरोधात आधी केवळ हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या केसमध्ये मिलिट्री कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. 
- रिपोर्टमध्ये या अधिकाऱ्याच्या हवाल्याने असे म्हटले गेले की, पाकिस्तान सरकारसा जाधव प्रकरणात भारताच्या 13 अधिकाऱ्यांची चौकशी करायची आहे. या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची परवानगीदेखिल मागण्यात आली आहे. पण भारताने अध्याप काहीही सहकार्य केलेले नाही. 
- पाकिस्ताननेही त्या 13 अधिकाऱ्यांची नावे सांगितलेली नाही, ज्यांची त्यांना चौकशी करायची आहे. आम्हाला जाधवच्या हँडलर्सपर्यंत पोहोचायचे असल्याचे हे अधिकारी म्हणाल्याचे पाक अधिकाऱ्याने सांगितले. 


जाधवबाबत भारताने माहिती द्यावी 
- रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, पाकिस्तानने भारताकडून जाधव यांचा नेव्ही सर्व्हीस रेकॉर्ड मागवला आहे. त्याशिवाय त्यांचे पेन्शन आणि पासपोर्टशी संबंधित कागदपत्रेही मागवसली आहेत. जाधव यांच्याकडे मुबारक हुसैन पटेल नावाचा बनावट पासपोर्ट आढळल्याचा पाकचा आरोप आहे.
- जाधव यांची मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर काही भागांत संपत्ती आहे. पाकिस्तानला त्याच्याशी संबंधित कागदपत्रांचीही तपासणी करायची आहे. 
- इंटरनॅशनल कोर्ट सध्या भारताच्या कॉन्स्युलर अॅक्सेसच्या मागणीवर बाजू ऐकत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...