आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - अमेरिका अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात 64 हजार नागरिक अमली पदार्थांच्या आहारी जाऊन मृत्यूमुखी पडले आहेत. विशेष म्हणजे, व्हिएतनाम युद्धात ठार झालेल्या अमेरिकन सैनिकांपेक्षा हा आकडा अधिक आहे. व्हिएतनाम युद्धात जवळपास 59 हजार अमेरिकन ठार मारले गेले होते. ड्रग्स ओव्हरडोस आणि व्यसन येथील मृत्यूचे मूळ कारण आहे. त्यात सर्वात वाइट अवस्था फिलाडेल्फिया प्रांतातील केन्सिंग्टन अॅव्हेन्यू शहरात आहे. येथील निम्म्याहून अधिक लोक अट्टल व्यसनी झाले आहेत.
केन्सिंग्टन अॅव्हेन्यू अमेरिकेतील सर्वात गरीब शहर म्हणून ओळखल्या जातो. या शहरातील लोक दारिद्ररेषेखाली जगतात. वेश्याव्यवसाय, बेकायदेशीर अमली पदार्थांची तस्करी, गुन्हेगारीच्या बाबतीतही हे शहर कुख्यात आहेत. कित्येक लोक या शहरांच्या रस्त्यांवर ड्रग्स घेऊन पडलेले दिसून येतात. हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या स्थानिकांमध्ये व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मेक्सिकोच्या अमली पदार्थ तस्करांचा या शहरावर पगडा असल्याचे सांगितले जाते. फोटोग्राफर जेफरी स्टॉकब्रिज यांनी त्याच शहरातील काही फोटोज टिपले आहेत.
पुढील स्लाइड्सवर, अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या या शहराचे आणखी काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.