आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी होती TV वर सुद्धा बंदी; आता इतका बदलला भारताचा हा शेजारी देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - कित्येक दशके टीव्ही आणि स्ट्रीट लाइटशिवाय जगणारा देश भूतानमध्ये अभूतपूर्व बदल घडून येत आहेत. डोंगर-दऱ्यांनी सुसज्ज अशी राजधानी थिम्पूमध्ये कॉफी शॉप आणि इंटरनेट कॅफेवर युवकांची गर्दी दिसून येते. कित्येक गेम पार्लर्समध्ये युवा वर्ग व्हिडिओ गेम आणि गॅम्बलिंग करताना दिसून येतात. भारत आणि चीनमध्ये असलेला हा देश आता जगाचे आधुनिक रंग अंगिकारत आहे. 
 
- भूतान जगातील एकमेव देश आहे, जो आपला विकासदर जीडीपी नव्हे, तर येथील नागरिकांच्या आनंदात हॅपिनेस इंडेक्समध्ये मोजतो.
- भारत आणि चीनचा शेजारी असतानाही या देशात कित्येक दशक टीव्ही आणि स्ट्रीट लाइटवर बंदी होती. पहिल्यांदा लावेल्या स्ट्रीट लाइटच्या विरोधात लोकांनी निदर्शने केली होती. 
- भूतानमध्ये दररोज नवनवीन आणि मोठ-मोठे बांधकाम केले जात आहे. रहिवासी आणि औद्योगिक क्षेत्र विकसित केले जात आहेत.
- मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे सर्वच स्तरांमध्ये बदल घडून येत आहेत. प्रत्येक घरात टीव्ही आणि मुख्य रस्त्यांवर पथदिवे दिसून येतील. 
- नेहमीच पारंपारिक पोशाखांमध्ये असलेले स्थानिक आता जीन्स आणि टीशर्टमध्ये फिरताना दिसून येत आहेत. फॅशन आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी लोकांचे जीवन बदलले आहे. 
- त्याचाच परिणाम म्हणून आता या देशात विविध ठिकाणी डिस्को आणि डान्स क्लब सुद्धा उघडले आहेत. पुरुषांसह महिला सुद्धा त्यामध्ये एंजॉय करतात. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, भूतानचे बदललेले चित्र फोटोजच्या माध्यमातून...
बातम्या आणखी आहेत...