आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Phuket: वादळाच्या तडाख्यात बोट उलटून 50 हून जास्त जण बेपत्ता; 48 पर्यटकांना वाचवण्यात नौदलाला यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुकेत (थायलंड) - दक्षिण थायलंडच्या किनारपट्टीजवळ बोट उलटून 50 प्रवासी समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले आहेत. गुरुवारी दुपारी आलेल्या समुद्रातील वादळानंतर बोट उलटून ही दुर्घटना घडली. मदतकार्य सुरू असून पाणबुडे समुद्राच्या खोल पाण्यात बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहेत.

 

अशी घडली दुर्घटना... 

फुकेतमधील फिनिक्स डायव्हिंग बोट अंदाजे 105 प्रवाशांना घेऊन गुरुवारी दुपारी समुद्रात गेली होती. दरम्यान, समुद्रात वादळ आल्याने 16 फूट उंचीच्या लाटा उसळल्या. या वादळात बोट उलटून 50 हून अधिक जण बेपत्ता झाले. 
बोटमध्ये एकूण 105 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी 93 पर्यटक, 1 गाइड, तर 11 क्रू मेंबर्सचा समावेश होता. पर्यटकांपैकी बहुतांश चिनी नागरिक असल्याची सूत्रांची माहिती आहे.

थायलंडच्या नौदल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 48 प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून त्यांना सुखरूप किनाऱ्यावर परत आणण्यात आले आहे.

 

सर्वात जास्त चिनी पर्यटक बेपत्ता
थायलंड नौदल, मरिन पोलिस आणि स्थानिक मच्छिमारांनी उर्वरित प्रवाशांच्या शोधासाठी गुरुवार संध्याकाळपासून प्रयत्न सुरू केले. परंतु रात्री उशिरा बचाव कार्य थांबवण्यात आले. यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी मदतकार्यासाठी पुन्हा सुरुवात केली. यासाठी हेलिकॉप्टर, अत्याधुनिक उपकरणे व पाणबुड्यांची मदत घेण्यात आली. 
चिनी माध्यमांनुसार, एका चिनी नागरिकाचा यात मृत्यू झाला असून 53 नागरिक बेपत्ता झाले आहेत. 

थायलंड हवामान विभागाने सांगितले की, हवामान उपग्रहावरून हे स्पष्ट होते की, फुकेत किनारपट्टीजवळ गुरुवारी वेगवान वादळी वारे वाहिले.  दरम्यान, आणखी 2 बोट बुडाल्याची माहिती आहे. परंतु त्यातील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे किनाऱ्याजवळ आणण्यात आले. 
फुकेतचे आइसलँड हे त्याच्या स्वच्छ किनारपट्टीमुळे तसेच लक्झरियस रिसॉर्ट्समुळे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या संबंधित आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...