आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी अबुधाबीच्या पहिल्या मंदिराचा केला शिलान्यास; देशवासीयांतर्फे मानले युवराजांचे आभार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईच्या आपल्या दुसऱ्या दौऱ्यात रविवारी अबुधाबीच्या ऑपेरा हाऊसमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी व्हिडिओ कान्फरन्सिंगद्वारे अबुधाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचा शिलान्यास केला. मोदींनी यूएईत राहणाऱ्या भारतीयांनाही संबोधित केले. ते म्हणाले की, अनेक दशकांनंतर भारताचे आखाती देशांशी एवढे व्यापक आणि दृढ नाते तयार झाले आहे. भारतीय समुदायाचे ३० लाख लोक येथील विकास यात्रेत सहभागी आहेत, त्यांनी या देशाला आपले घर मानले आहे याचा भारताला अभिमान आहे. मी सव्वाशे कोटी भारतीयांतर्फे युवराजांचे आभार मानतो. हे मंदिर म्हणजे दोन्ही देशांतील सद््भावनांचा सेतू ठरेल. आमच्याकडे मंदिर मानवतेचे माध्यम आहे.  मोदींनी सहाव्या जागतिक सरकार परिषदेलाही संबोधित केले. त्यात १३० देशांचे प्रतिनिधी आणि ४००० प्रतिनिधी सहभागी झाले. यंदा भारत या परिषदेचा प्रमुख अतिथी होता. मोदी म्हणाले की, यात सहभागी होणे फक्त माझ्यासाठी नव्हे तर भारतातील सव्वाशे कोटी लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. तंत्रज्ञानामुळे सामान्य माणूस मजबूत झाला आहे.  
  

आणखी पुढे जायचे, ग्लोबल बेंचमार्कपर्यंत पोहोचू
मोदी म्हणाले की, २०१४ मध्ये ईझ ऑफ डुइंग बिझनेसमध्ये आम्ही ४२ गुणांनी पुढे जाऊन १०० व्या क्रमांकावर आलो आहोत. आम्हाला आणखी पुढे जायचे आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्वकाही करू. आमचा उद्देश भारताला ग्लोबल बेंचमार्कच्या स्तरापर्यंत आणण्याचा आहे.  


लोक विचारतात; मोदीजी, काम कधीपर्यंत होईल?  
मोदी म्हणाले की, एक वेळ अशी होती की सामान्य माणूस हे शक्य आहे का, होऊ शकते का, असे विचारत होता. पण चार वर्षांत देश आता शक्य आहे की नाही हे विचारत नाही तर मोदीजी, हे केव्हा होईल, असे विचारत आहे. या प्रश्नात तक्रार नाही, आमच्यावरील विश्वास आहे.  


नोटबंदीमुळे काही लोकांची रात्रीची झोप उडाली  
मोदी म्हणाले की, २१ व्या शतकाला आशियाचे शतक करण्यासाठी मेहनत करावी लागेल. मी नोटबंदी केली तेव्हा हे योग्य पाऊल आहे, हे देशाच्या गरिबांना समजले, पण काही लोकांची रात्रीची झोप उडाली आहे. अनेक वर्षांपासून अडकलेला जीएसटी कायदा मंजूर करून घेतला.


अबुधाबीचे पहिले आणि यूएईचे तिसरे मंदिर  
- अबुधाबीतील हे पहिले मंदिर आहे. दोन मंदिरे आणखी आहेत, त्यात साईबाबांचे आहे. त्याशिवाय एक गुरुद्वाराही आहे.  
- यूएईत मंदिर बनवण्यासाठी मोहीम बी. आर. शेट्टींनी सुरू केली होती. शेट्टी ‘यूएई एक्स्चेंज’नावाच्या कंपनीचे एमडी, सीईओ आहेत. 
- हे मंदिर ५५ हजारर चौरस मीटरमध्ये होत आहे. त्याचे बांधकाम २०२० पर्यंत पूर्ण होईल.

बातम्या आणखी आहेत...