आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - ख्रिस्मस निमित्त सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी कॅथोलिक समुदायासह साऱ्या जगाला शरणार्थींचा स्वीकार करण्याचा संदेश दिला आहे. त्यांचा ख्रिस्मसचा संदेश पूर्णपणे शरणार्थींच्या थीमवर आधारित होता. एवढेच नव्हे, तर त्यांनी शरणार्थींना स्वीकारण्याचे महत्व जगाला पटवून देताना शरणार्थींची तुलना मदर मॅरी आणि जोसेफ यांच्याशी केली आहे. सीरिया, इराक आणि अफ्रिकेसह विविध देशांमधून 2.2 कोटी शरणार्थी जगातील विविध देशांच्या दारांवर शरण मागत आहेत. त्यामध्ये म्यानमारच्या रोहिंग्या मुस्लिमांची आणखी भर पडली आहे.
काय म्हणाले पोप फ्रान्सिस...
> पोप फ्रान्सिस यांचे आजोबा सुद्धा इटलीत शरण घेऊन आले होते. व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर्स बॅसिलिया येथे ख्रिस्ती अनुयायांना संबोधित करताना ते बोलत होते.
> बायबलनुसार, मॅरी आणि जोसेफ यांनाही नझारेथ ते बेथलहॅमपर्यंत शरण घेण्यासाठी प्रवास करावा लागला. आजच्या शरणार्थींची अवस्था तशीच आहे.
> त्यांनाही त्यांच्याच जमीनींवरून काही राजकीय नेत्यांनी स्वतःचे स्वार्थ साध्य करून हकलून दिले आहे. विविध हुकूमशहा आणि लष्करांच्या अत्याचारांना कंटाळून ते आपले देश सोडत आहेत.
> मदर मॅरी आणि जोसेफ यांच्या पाऊल खुणांमध्ये अनेक पाऊल खुणा लपलेल्या आहेत. करोडो शरणार्थींना जाण्यासाठी मार्गच नाही. त्यांच्यावर दुर्लक्ष करू नका असा संदेश पोप फ्रान्सिस यांनी दिला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.