आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांनी टिलरसन यांना हटवले; पोंपियो अमेरिकेचे नवीन परराष्ट्रमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवटच्या भाषणाच्या वेळी टिलरसन यांनी कथितरीत्या ट्रम्प यांना जोकर म्हटले आहे. - Divya Marathi
शेवटच्या भाषणाच्या वेळी टिलरसन यांनी कथितरीत्या ट्रम्प यांना जोकर म्हटले आहे.

वाॅशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी काही मतभेदांमुळे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांना पदावरून हटवले अाहे. एका वर्षात अापल्या चमुमध्ये  अनेक बदल करणाऱ्या ट्रम्प यांचा हा सर्वात माेठा बदल मानला जात अाहे. टिलरसन यांच्या जागी अाता सीअायएचे संचालक माइक पाेंपियाे परराष्ट्रमंत्री असतील. तसेच सीअायएच्या संचालकपदावर प्रथमच एका महिलेची नियुक्ती करण्यात अाली असून, उपसंचालक असलेल्या जीना हाॅस्पेल अाता सीअायएचे संचालकपद सांभाळतील. या नवीन नियुक्त्यांसाठी अमेरिकी सिनेटची मंजुरी घ्यावी लागणार अाहे.  


या बदलांबाबत बाेलताना ट्रम्प यांनी सांगितले की, सध्याच्या नाजूक काळात पाेंपियाे यांची निवड अगदी याेग्य अाहे. ते काेरिया क्षेत्रास अण्वस्त्रमुक्त करणे, विराेधकांचा सामना करणे, संबंध व अाघाडी मजबूत करणे अादी कामे चांगल्या पद्धतीने करतील. ट्रम्प यांनी अातापर्यंत परराष्ट्रमंत्रिपदाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडल्याबद्दल टिलरसन यांचे अाभार मानले. दरम्यान, काही महिन्यांपासूनच टिलरसन यांना पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू हाेत्या. उद्याेगपती असलेल्या टिलरसन यांची गतवर्षी १ फेब्रुवारीला परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात अाली हाेती. यापूर्वी त्यांनी काेणतेही राजकीय पद भूषवलेले नव्हते.

 

समाेर अाले मतभेद...  
टिलरसन यांना पदावरून हटवण्याचा ट्रम्प यांचा हा अातापर्यंतचा सर्वात माेठा निर्णय अाहे. दाेघांमध्ये अनेक महिन्यांपासून तणाव निर्माण झाला हाेता. तसेच उत्तर काेरिया व रशियाच्या मुद्द्यावर अनेकदा मतभेद निर्माण झाले हाेते. त्यानंतर टिलरसन यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला ऊत अाला हाेता. ट्रम्प यांनी गत शुक्रवारीच टिलरसन यांना राजीनामा देण्यास सांगितले हाेते; परंतु त्यांच्या अाफ्रिका दाैऱ्यामुळे ते तत्काळ याची घाेषणा करू शकत नव्हते, असे व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

 

जीना ३० वर्षांपासून सीअायएमध्ये कार्यरत
सीअायएच्या संचालकपदी एका महिलेची झालेली नियुक्ती एेतिहासिक अाहे. या पदासाठी निवड झालेल्या त्या पहिल्या महिला प्रमुख अाहेत. जीना हाॅस्पेल या ३० वर्षांपासून सीअायएमध्ये अाहेत, असेही ट्रम्प यांनी जीनांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...