आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्राध्यक्ष निवडणूक: थंडीच्या कडाक्यातही मतदान, पुतीन यांची दावेदारी निश्चित!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को- रशियात रविवारी राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. कडाक्याच्या थंडीत लोक बाहेर पडले होते. विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांचा विजय केवळ आैपचारिकता म्हणून राहिल्याचा दावा माध्यमातून करण्यात आला आहे. ते विजयी झाल्यास त्यांची ही चौथी कारकिर्द राहिल. निकाल सोमवारी अपेक्षित आहे. 


रविवारी सायंकाळपर्यंत देशातील काही भागात सुमारे ७६ टक्के तर बहुतांश ६० ते ७० टक्के  मतदान झाल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीसाठी ११ कोटीहून अधिक मतदार पात्र होते. कामगार वर्गापासून सर्वच मतदारांवर मतदान करण्याचा दबाव होता, अशी टीका करण्यात आली आहे. ही निवडणूक म्हणजे केवळ फार्स आहे, असा विरोधकांनी आरोप केला आहे तर पुतीन यांच्या समर्थकांनी आपला ६५ वर्षांचा नेता पुन्हा एकदा देशाचा गौरव अबाधित ठेवण्यासाठी सज्ज होणार आहे, अशी भावना व्यक्त केली. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी प्रशासनावर दबाव व ताण पडल्याचे दिसून आले. कारण मतदानाचा टक्का घसरला तर त्याचा फटका पुतीन यांच्या कारकिर्दीच्या वाटेत अडसर ठरू शकतो. शिवाय देशात व जगभरात प्रतिमा मलिन होऊ शकते.

 

२०१२ मुळे अधिक सतर्कता
पुतीन यांच्या विरोधात २०१२ च्या निवडणुकीत संतापाची परिस्थिती निर्माण झाली होती. मतदान प्रक्रियेतील गडबड, हिंसाचार यामुळे विरोधकांनी पुतीन यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे गतवेळची वाटचाल पुतीन यांच्यासाठी सोपी राहिलेली नव्हती. म्हणूनच प्रशासन सज्ज होते. 

 

> १ ,४५, ००० निरीक्षकांच्या निगराणीखाली जगातील सर्वात मोठ्या देशात निवडणूक प्रक्रिया.

 

> १५०० परदेशी निरीक्षकांचा ताफाही देशभरात.

 

 

मतदानातील नियमभंगाच्या घटना ऑनलाईन

विरोधी पक्ष नेते अॅलेक्सी नावल्नी यांच्यासह अनेक निरीक्षक संस्था, संघटनांनी रविवारच्या मतदान प्रक्रियेतील हिंसाचार व नियमभंग प्रकाराची छायाचित्रे ऑनलाईन पोस्ट करून वास्तव चव्हाट्यावर आणले. काही प्रांतात मतपेट्यांत जास्तीच्या मतपत्रिका आढळून आल्या. निवडणूक अधिकाऱ्याने निरीक्षकाशी बाचाबाची करणे, सीसीटीव्हीवर पक्षीय ध्वज डकवणे, शेवटच्या क्षणी मतदारांच्या नोंदणीत बदल इत्यादी बेकायदा गोष्टी घडून आल्याचा दावा विरोधकांनी केला. पुतीन यांच्या समर्थकांनी हा दावा केला.

 

पाहणीत ७० टक्क्यांचा कौल

डबल एंजटवर विषप्रयोग केल्यावरून ब्रिटननेे रशियाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला अाहे. त्यामुळे पुतीन यांच्या चौथ्या कारकिर्दीवर काही वाईट परिणाम होऊ शकतो, असा दावा जाणकारांनी केला अाहे. परंतु एका पाहणीत पुतीन यांना ७० टक्के कौल मिळेल तर विरोधकांना १० टक्क्यांपर्यंत मतदान होईल, असे म्हटले आहे. तसे झाल्यास सोव्हिएत हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन यांच्यानंतर दीर्घकाळ देशाच्या सत्तेवर राहणारे ते पहिलेच सत्ताधारी ठरतील.

 

 

पुतिन यांच्यासमोर 7 प्रतिस्पर्धी नावापुर्ते
या निवडणुकीत तब्बल 11 कोटी नागरिक मतदानात सहभाग घेत आहेत. रशियाच्या स्थानिक वेळेनुसार, सकाळी 8 वाजता सुरू झालेले हे मतदान रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. राजधानी मॉस्को येथे मतदानाला भारतीय समयानुसार, रविवारी सकाळी सुमारे 11 वाजता झाली. या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, या सर्व उमेदवारांना डमी प्रतिस्पर्धी असेही म्हटले जात आहे.

 

भारतातही झाले मतदान
भारतात राहणाऱ्या रशियन नागरिकांना देखील निवडणुकीत मतदान करता यावा अशी व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे मतदान केंद्र बनवण्यात आले. त्याच ठिकाणी शुक्रवारी मतदान देखील पार पडले. यापूर्वी भारतातील रशियन नागरिक दिल्लीत रशियाच्या दूतावासात मतदानाला येत होते. 


पुढे वाचा, पुतिन यांच्यासाठी बदलली देशाची राज्यघटना, नेमके कोणते बदल झाले...

बातम्या आणखी आहेत...