आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामॉस्को- रशियात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी रविवारी मतदान होईल. रशियाचे ११ कोटी मतदान आपला अध्यक्ष निवडतील. विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात आठ उमेदवार मैदानात आहेत. पुतीन सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. सर्व निवडणुकांत पुतीन यांना यश मिळाले आहे. या वेळीही पुतीन यांचा विजय निश्चित असल्याचे दिसत आहे. पुतीन यांचे सर्वात मोठे टीकाकार अॅलेक्सी नावाल्नी अपात्र ठरल्याने स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. नावाल्नी मैदानात असते तर ही निवडणूक पुतीन यांच्यासाठी एवढी सोपी नसती. आता ओपिनियम पोलमध्ये पुतीन विरोधकांपेक्षा १० पट जास्त लोकप्रिय आहेत. रशियन पब्लिक रिसर्च सेंटरच्या पोलनुसार निवडणुकीच्या आधी पुतीन यांच्या लोकप्रियतेत १५% वाढ झाली आहे. सुमारे ७०% लोकांनी पुतीन यांना पुन्हा निवडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या प्रमुख विरोधकांना ६.७% लोकांचा पाठिंबा आहे. डिसेंबरमध्ये पुतीन यांचे रेटिंग ५३.५% होते. या वेळी मतदान ७०% पेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.
पुतीन यांचा खुलासा : माझे आजोबा लेनिन यांचे स्वयंपाकी होते, वडीलही स्टॅलिन यांच्या घरी जायचे
पुतीन यांनी निवडणुकीआधी डॉक्युमेंट्रीत खुलासा केला आहे की, त्यांचे आजोबा स्पिरिडॉन पुतीन मार्क्सवादी नेते व्लादिमीर लेनिन आणि जोसेफ स्टॅलिन यांचे स्वयंपाकी होते. पुतीन म्हणाले की, माझे वडीलही कधीकधी स्टॅलिन यांच्या घरी जात होते आणि ते कसे राहतात हे सांगत असत.
- पुतीन २००० आणि २००४ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले. रशियात कोणीही सलग दोनपेक्षा जास्त वेळा अध्यक्ष राहू शकत नाही. त्यामुळे २००८ मध्ये त्यांनी आपले सहकारी दमित्री मदवेदेव यांना उमेदवार केले. दमित्रींनी अध्यक्ष होताच पुतीन यांना पंतप्रधान केले. २०१२ मध्ये पुतीन पुन्हा अध्यक्ष झाले आणि अध्यक्षांचा कार्यकाळ ४ वरून वाढवून ६ वर्षे केला. आता ते २०१८ मध्ये चौथ्यांदा मैदानात आहेत.
रशियातील निवडणुकीबाबतची इत्थंभूत माहिती
अशी होते रशियाच्या अध्यक्षपदाची निवड
- रशियात अध्यक्षाची थेट निवडणूक जनताच करते. बहुपक्षीय व्यवस्था आहे. रशियाची लोकसंख्या १४.२ कोटी आहे. त्यात ११ कोटी मतदार आहेत. अध्यक्ष होण्यासाठी ५०% पेक्षा जास्त मते मिळवावी लागतात. कोणत्याही उमेदवाराला तेवढी मते न मिळाल्यास ३ आठवड्यांनंतर म्हणजे ८ एप्रिलला पुन्हा मतदान होईल. आतापर्यंत फक्त १९९६ मध्येच दुसऱ्यांदा निवडणूक घ्यावी लागली होती.
- तेथे उपाध्यक्षाचे पद नाही. अध्यक्षांचा मृत्यू झाल्यास किंवा पदावरून हटवले तर पंतप्रधान नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदी राहतात. ३ महिन्यांत अध्यक्ष निवडणूक घ्यावी लागते.
पुतीन अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात
- पुतीन अपक्ष म्हणून मैदानात आहेत. रशियात अपक्ष निवडणूक लढण्यासाठी उमेदवाराला ३ लाख मतदारांच्या स्वाक्षऱ्या गोळा कराव्या लागतात. राजकीय पक्षाकडून लढणाऱ्यास १ लाख सह्या गोळा कराव्या लागतात.
पुतीन यांच्यावर हेराफेरीचा आरोप
- २०१२ मध्ये रात्री ८ वाजता मतदान संपले होते. दोन तासांनीच पुतीन यांच्या विजयाची घोषणा झाली. पुतीन यांच्या टीकाकारांच्या मते, त्यांनी निवडणूक यंत्रणा हॅक केली होती. येथे दिखाव्यासाठी लोकशाही आहे. दोन तासांत ११ कोटी मतांची मोजणी शक्यच नाही.
> १९६३ कोटी रुपये निवडणूक खर्चासाठी दिले आहेत आयोगाला.
> १४ हजार मतदान प्रक्रिया आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा प्रत्येक केंद्रावर.
> ४२ लाख रुपये खर्च करून अध्यक्ष निवडणुकीचा लोगो तयार केला आहे.
> वाढती महागाई आणि पाश्चिमात्य देशांनी रशियावर लावलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे मंदीसारखी स्थिती आहे. दर तीन वर्षांनी किमान भत्ते कमी झाले आहेत. मात्र, काही दिवसांपासून स्थिती ठीक आहे. महागाई स्थिर आहे. निवडणुकीआधी पुतीन यांनी संसदेत विधेयक मंजूर केले आहे. त्यात किमान मजुरी दरमहा १९७ डॉलर करण्यात आली आहे.
आर्थिक चढ-उतार
वाढती महागाई आणि पाश्चिमात्य देशांनी रशियावर लावलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे मंदीसारखी स्थिती आहे. दर तीन वर्षांनी किमान भत्ते कमी झाले आहेत. मात्र, काही दिवसांपासून स्थिती ठीक आहे. महागाई स्थिर आहे. निवडणुकीआधी पुतीन यांनी संसदेत विधेयक मंजूर केले आहे. त्यात किमान मजुरी दरमहा १९७ डॉलर करण्यात आली आहे.
पुतीन यांचे बालपण गरिबीत व्यतीत, उंदीर पकडून सोडण्याचे काम केले, आज ३ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक
- पुतीन यांचे जीवन अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे कुटुंबीय सेंट पीटर्सबर्गच्या एका अपार्टमेंटच्या ब्लॉकमध्ये आणखी तीन कुटुंबांसोबत राहत होते. पुतीन उंदीर पकडून बाहेर सोडण्याचे काम करत होते.
- पुतीन यांनी १८ व्या वर्षी ज्युदो शिकणे सुरू केले. कारण ते स्वत:ला समवयस्कांमध्ये अपरिपक्व मानत असत. ते सांबो या रशियन मार्शल आर्टचे मास्टर आहेत.
- पुतीन यांनी लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीतून १९७५ मध्ये कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर ते केजीबी या सोव्हिएत गुप्तचर संस्थेत सहभागी झाले आणि तेथे १९९१ पर्यंत काम केले.
- रशियात भ्रष्टाचार संपवण्याचे श्रेय पुतीन यांना आहे. २०१४ मध्ये आलेल्या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, रशिया हा भ्रष्टाचार सर्वात कमी असणारा देश आहे.
- पुतीन यांना मारिया आणि टॅकटरिना या दोन मुली आहेत. एप्रिल २०१४ मध्ये पुतीन यांचा घटस्फोट झाला. पुतीन यांनी आपले कौटुंबिक आयुष्य लपवून ठेवले आहे.
- पुतीन यांच्या संपत्तीबाबत म्हटले जाते की, ते ३ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याकडे २० बंगले एका बंगल्याची किंमत ५ हजार कोटी रुपये आहे.
पुढील स्लाइडवर पाहा आणखी माहिती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.