आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rasputin: ना बंदुकीच्या गोळ्या मारू शकल्या, ना सायनाइड! एकावेळी डझनभर महिलांशी ठेवायचा संबंध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - रासपुतिन हा रशियातील एवढा गूढ अन् क्रूर माणूस होता, ज्याला ना बंदुकीच्या गोळ्या मारू शकल्या, ना सायनाइडसारखे जहाल विष! असे म्हणतात, त्याने संमोहनाच्या जोरावर रशियाच्या राजालाही आपला गुलाम बनवले होते. कधीकाळी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर गुजराण करणारा रासपुतीन अचानक राजमहालातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती कसा बनला हे कुणालाच माहिती नाही. तब्बल 120 वर्षांपूर्वी रशियाचा राजा झार निकोलस दि्वतीय आणि त्याची पत्नी महाराणी अलेक्जेंड्रावरील रासपुतिनची जादू आजही कहाण्यांद्वारे सांगितली जाते. 

पहिल्या जागतिक महायुद्धानंतर रशियाच्या 300 वर्षांपासून सुरू असलेल्या साम्राज्याचा अंत झाला होता. 16-17 जुलैच्या रात्री राजा झारच्या पूर्ण शाही कुटुंबाची महालात घुसून हत्या करण्यात आली होती. यानिमित्त आम्ही सांगत आहोत त्या काळातील सर्वात खतरनाक व्यक्तिमत्त्वाची कहाणी..

 

जे बोलायचे ते व्हायचे खरे...

- ग्रेगोरी रासपुतिनचा जन्म त्याच वर्षी झाला होता ज्या वर्षी भारतात महात्मा गांधींचा झाला. 1869 मध्ये एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला रासपुतिन घरदार सोडून साधू बनला. युरालच्या डोंगरांवर तो एकटाच भटकत होता. 1892 मध्ये रासपुतिनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. एक मठात कित्येक दिवस घालवल्यानंतर त्याला काहीतरी शक्ती प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. तो जे काही बोलायचा, ते सत्य व्हायचे. त्याचे वागणे असे होते की लोकांना धडकीच भरायची. आजारी अन् भ्याड लोकांचा अशा माणसांवर खूप विश्वास असतो. मग काय जिकडे-तिकडे रासपुतिनचाच बोलबोला होऊ लागला. त्याच्याकडे दैवीय शक्ती असल्याचे मानले जाऊ लागले. तो खूप हट्टी अन् घमेंडखोर बनला.

 

राजमहालातून सुरू झाले मायाजाल
- 1906 मध्ये रासपुतिनची ख्याती झार निकोलसच्या दरबारापर्यंत गेली. येथूनच त्याच्या मायाजालाची सुरुवात झाली. जेव्हा रासपुतिन दरबारात गेला, तेव्हा महाराणी अलेक्जेंड्रा दीर्घकाळापासून आपल्या मुलासाठी एका वैद्याचा शोध घेत होती. तिच्या मुलाला हिमोफिलिया आजार होता. राजकुमाराला एक जराशी जखमही जीवघेणी होती. त्या काळी या आजारावर कोणताही उपचार नव्हता. अशा वेळी रासपुतिनने राणीला विश्वास दिला की, राजकुमाराला काहीही होणार नाही. त्याने काय केले कुणास ठाऊक, परंतु काही दिवसांतच राजकुमार अगदी ठणठणीत झाला. यामुळे शाही दरबारात रासपुतीनचे महत्त्व वाढले.

 

एकावेळी डझनभर महिलांशी ठेवायचा संबंध
- राजघराण्यात वाढलेल्या मानामुळे रासपुतिन आणखीनच घमेंडखोर अन् अय्याश बनला. तो अनेक महिलांसोबत राहू लागला. सकाळपासून ते रात्रीपर्यंत तर दारू अन् महिलांमध्ये राहायचा. त्याला अंघोळ घालण्यासाठी अनेक महिला तैनात असायच्या. शाही दरबारातील महिलांशी सेक्स आणि प्रेमसंबंधांचे त्याचे किस्से पसरू लागले. काहीजण म्हणतात की, तो एवढा अय्याश झाला होता की, एकत्र डझनभर महिलांशी संबंध ठेवायचा. कित्येक महिने स्वत:चे कपडेही बदलत नव्हता. त्याच्यापासून बकऱ्यासारखा वास यायचा. तरीही महिला त्याच्याजवळ राहायच्या. हे सर्व संमोहन विद्येमुळे करायचा असे मानले जायचे.

 

महाराणीशी अफेअरची चर्चा
- असे मानले जाते की, रासपुतिनने आपल्या संमोहनाने महाराणी अलेक्जेंड्रालाही वश केले होते. 1914 मध्ये जेव्हा पहिल्या जागतिक महायुद्धाला सुरुवात झाली तेव्हा अलेक्जेंड्राला लोकांनी लक्ष्य बनवले. रासपुतिन आणि महाराणीची जवळीक लोकांना खटकू लागली. पूर्ण रशियात दोघांमधील लैंगिक संबंधांच्या कहाण्या चर्चिल्या जाऊ लागल्या. परंतु, त्या कधीही सिद्ध होऊ शकल्या नाहीत. तथापि, इतिहासकारांच्या मते, अनेक ऐतिहासिक पत्रे याचे पुरावे आहेत. एका पत्रात अॅलेक्जेंड्राने रासपुतिनला लिहिले होते, ''माझ्या मनाला तुझ्यासोबतच समाधान मिळते. तूच माझा गुरू आहेस. मी तुझ्या हाताचे चुंबन घेते अन् तुझ्या खांद्यावर माझे डोके ठेवते.''

 

ना बंदुकीची गोळी मारू शकली नाही, जहाल सायनाइडचे विष, पुन्हा जिवंत झाला...
जेव्हा रशियाचा महायुद्धात पराभव होऊ लागला, तेव्हा रासपुतीनच्या सांगण्यावरूनच हे सर्व होत आहे, असे सांगितले जाऊ लागले. शाही घराणे एका सणकीच्या सांगण्यावरून वागत आहे. अशी बातमी पसरली की, रासपुतिन आणि राणी जर्मनीचे एजंट आहेत. येथूनच रासपुतिनच्या अंताला सुरुवात झाली. 1916 मध्ये राजकुमार फेलिक्स युसुपोवने एका पार्टीमध्ये रासपुतीनला बोलावले आणि तेथेच त्याच्या केकमध्ये सायनाइड मिसळून दिले. परंतु खून करणारेच चकित झाले, कारण विषाचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. युसुपोवने रागातच बंदू काढली आणि रासपुतिनच्या पोटात गोळ्या झाडल्या. रासपुतीन रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. परंतु काही क्षणात पुन्हा उठून उभा राहिला आणि राजकुमाराला पकडले. युसुपोवने आणखी दोन गोळ्या झाडल्या आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली. शेवटी कापडामध्ये गुंडाळून त्याला बर्फाळ नदीत फेकण्यात आले.

- ही घटना 30 डिसेंबर 1916 ची आहे. सेंट पीटर्सबर्ग नदीच्या बर्फाळ पाण्यातून एका साधूचा मृतदेह काढण्यात आला. तेव्हा कळले की, तो रासपुतिन होता. सर्वच चकित झाले, कारण त्याचा मृत्यू हा विषाने अथवा बंदुकीच्या गोळ्यांनी नाही, तर पाण्यात बुडून झाला होता. यानंतर लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली की, रासपुतीनची आत्मा आता विध्वंस करेल. झालेही तसेच. असे मानले जाते की, मृत्यूनंतरही रासपुतीनच्या आत्म्याने दिलेल्या शापामुळे राजा झारचा वंश संपुष्टात आला. त्याच्या मृत्यूच्या वर्षभरानंतरच रशियात ऑक्टोबर क्रांती झाली आणि लेनिनने कम्युनिज्म आणून राजा झार आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाची त्याच्याच महालात हत्या केली.

 

आजही जतन करून ठेवलाया प्रायव्हेट पार्ट
- इतिहासकारांचा दावा आहे की, रासपुतीन जगातील सर्वात मोठा प्रायव्हेट पार्ट असणारा पुरुष होता. रशियाच्या म्युजियम रशियन एरोटिकामध्ये त्याचा प्रायव्हेट पार्ट सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी photos... 

 

बातम्या आणखी आहेत...