आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतर तुमच्या FB अकाऊंटचे काय होणार, कोर्टाने सुनावला ऐतिहासिक निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जर्मनीच्या मुख्य न्यायालयाने मृत व्यक्तीच्या फेसबूक अकाऊंटबाबत एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायालयाने निर्णयात फेसबूकला मृत मुलीचे अकाऊंट तिच्या आईला लॉग इन करण्याची परवानगी द्यावी असा  आदेश दिला. यासाठी मृत मुलीच्या आईला मोठा संघर्ष करावा लागला. मात्र, त्यावरून हे स्पष्ट झाले की, जर अल्पवयीन फेसबूक अकाउंट होल्‍डरचा मृत्यू झाला तर त्याच्या अकाऊंटचे अधिकार त्याच्या आई वडिलांना मिळू शकतात. 


जर्मनीत 2012 मध्ये एका मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तिच्या फेसबूक अकाऊंटच्या माध्यमातून तिच्या आईला काही मिळते का हे पाहायचे होते. त्यासाठी तिच्या मृत्यूनंतर त्यांनी तिचे फेसबुक अकाऊंट लॉग इन करण्याची परवानगी मागितली होती. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुले त्यांनी कोर्टात धाव घेतली. बर्लिनच्या उच्च न्यायालयाने हा निर्णय सुनावला. मुले ऑनलाईन काय करतात हे जाणून घेण्याचा आई वडिलांना अधिकार असल्याचे बर्लिन उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...