आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईच्या राजमहलातून पळाली राजकुमारी, स्वतःच्या वडिलांवर लावले असे आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - जगातील सर्वात आलीशान आयुष्य म्हटले की दुबईचे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, याच दुबईतील राजाची कन्या अर्थात राजकुमारी पळून गेली आहे. वडिलांनी आपल्याला जनावरांसारखे कैद करून ठेवले होते असा आरोप तिने लावला आहे. ब्रिटिश मीडिया डेली मेलच्या वृत्तानुसार, दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल-मक्तूम यांची कन्या राजकुमारी यूएतून पळून गेली. तसेच तिने अमेरिकेत शरण मागितली आहे. ती कितपत खरे बोलत आहे. किंवा ती दुबईच्या शासकाचीच मुलगी आहे का हे अजुनही अधिकृतरीत्या स्पष्ट झाले नाही.

 

काय आहे प्रकरण?
- डेली मेलच्या वृत्तानुसार, संयुक्त अरब अमिरात (दुबई) चे शासक शेख मोहम्मद यांची कन्या असल्याचा दावा करणारी लतिफाने आपल्या वडिलांवर अनेक आरोप लावले आहेत. 
- 33 वर्षीय शेख लतिफा हिने सांगितल्याप्रमाणे, ती एक सामान्य आयुष्य जगण्यासाठी दुबईतून पळून निघाली आहे. यूएईमध्ये महिलांवर अत्याचार केले जातात. तिला सुद्धा गुपचूपरित्या 3 वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले होते.
- यानंतर मानसिक आजार असल्याचा बहाणा करून रुग्णालयात नजरकैद केले. तिने सांगितल्याप्रमाणे, दुबईत तिची ओळखच नाही. तिच्या वडिलांच्या 6 पत्न्या आणि 30 मुले-मुली आहेत.
- लतिफाने सांगितले, फ्रान्सच्या एका निनावी गुप्तहेराने तिची मदत केली. त्याच्याच मदतीने ती भारताच्या एका निनावी समुद्र किनारी लपली आहे. तसेच अमेरिकेत शरण घेण्यास इच्छुक आहे. 
- ती 16 वर्षांची होती तेव्हा देखील घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, तो प्रयत्न अयशस्वी ठरला आणि तिला घरातच कैद करण्यात आले. 
- तेव्हापासून तिच्या 24 तास नजर ठेवण्यात आली. तसेच 3 वर्षांसाठी तुरुंगात सुद्धा पाठवण्यात आले. 2000 पासून तिने बाहेरचे जग पाहिले नाही असा दावा केला. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कथित राजकुमारीचे ओळखपत्र आणि आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...