आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खानला काही भारतीय मुलेही आहेत, त्याने स्वतःच सांगितल्याचा Ex Wife रेहम खानचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - पाकिस्तानमधील राजकीय पक्ष पीटीआयचा प्रमुख इम्रान खान याला काही भारतीय मुलेही असल्याचा खळबळजनक दावा त्याची Ex Wife रेहम खानने केला आहे. रेहम खान हिचे 'टेल ऑल' या पुस्तकाचा काही भाग लीक झाला आहे. या पुस्तकात रेहमने इम्रानबाबत बरेच खळबळजनक खुलासे केले असून, हाही त्यापैकीच एक असल्याचे सांगितले जात आहे. 


रेहमच्या या पुस्तकातील मजकुरानुसार, इम्रानने रेहमशी लग्नानंतर तिला याबाबत सांगितले होते. इम्रानची मुलगी ट्रायनविषयी गप्पा सुरू होत्या तेव्हा इम्रानने तिला हे सर्व सांगितले होते. पुस्तकातील मजकुरानुसार त्यांच्याच असे संभाषण झाले होते...
इम्रान - फक्त ती एकच नाही तर पाच आहेत. 
रेहम - पाच म्हणजे? 
इम्रान - पाच मुले. 
रेहम - तुला अशी पाच अनावरस मुले आहेत? 
इम्रान - हो 
रेहम - सर्व गोरे आहेत का? 
इम्रान - नाही, काही भारतीय आहेत. सर्वात मोठ्याचे वय 34 आहे. 
रेहम - असे कसे होऊ शकते, त्याची आई समोर नाही आली का? 
इम्रान - ती चंद्रावर गेली होती. तिला मूल होत नव्हते. तिने खूप मजा केली आणि मला हे सर्व गोपनीय ठेवण्यास सांगितले. 
रेहम - इतरांचे काय त्याही काही म्हणाल्या नाही? 
इम्रान - सर्व विवाहित होत्या आणि त्यांना त्यांचे वैवाहिक जीवन खराब करायचे नव्हते. 
रेहम - हे इतर कोणाला माहिती आहे का?
इम्रान - जेमिमाला माहिती आहे, कारण मी सांगितले होते? 

 

यापूर्वीही केला आहे आरोप 
रेहमने यापूर्वीही पुस्तकाच्या माध्यमातून इम्रानबाबत गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली होती की, इम्रान गे आहे आणि त्याने तिला त्याच्या मित्रांबरोबर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला होता. लग्नापूर्वी इम्रानने तिचा छळ केला होता असेही रेहम म्हणाली होती. 

बातम्या आणखी आहेत...