आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसाला 40 सिगारेट ओढणारा चिमुकला आठवतो? आता दिसतो असा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इंडोनेशियातील या चिमुकल्याचे फोटोज आणि व्हिडिओज 8 वर्षांपूर्वी व्हायरल झाले, तेव्हा सर्वांना पाहून धक्का बसला होता. अवघ्या 2 वर्षांचा हा मुलगा दिवसातून सरासरी 40 सिगारेट ओढायचा. आल्दी रिझाल नावाचा हा चिमुकला सिगारेट नाही मिळाल्यास आपले डोके भिंतीवर आपटायचा. अखेर इंडोनेशिया सरकारने या मुलाच्या व्यसनाची गंभीर दखल घेतली. तसेच एका मोहिमेत त्याला सिगारेटच्या व्यसनातून मुक्त केले. 

 

शाळेत अभ्यासू बनलाय आल्दी...
- इंडोनेशियाच्या सुमात्रा येथे राहणाऱ्या आल्दीचे फोटोज आणि व्हिडिओज 2010 मध्ये व्हायरल झाले, तेव्हा तो साऱ्या जगात चर्चेत आला. 
- इंडोनेशिया सरकारच्या मदतीने त्याने 2013 मध्ये सिगारेट सोडली. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या जेवनाची सवय बिघडल्याची तक्रार केली. 
- वयाच्या 5 व्या वर्षी अती जेवनामुळे त्याचे वजन 25 किलो झाले होते. मात्र, दोन वर्षांपूर्वीच त्याने सिगारेट आणि लठ्ठपणा अशा दोन्ही गोष्टींवर मात केली. 
- 10 वर्षांचा झालेला आल्दी आता इंग्रजी शाळेत जातोय. त्याने आपले वजनही कमी केले आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्याच्या आधीचे आणि सध्याचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...