आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 30 वर्षांनंतर कंडोममुळे झाली नराधमाला अटक, 8 वर्षीय चिमुरडीची रेप करून केली होती हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉज एंजलिस (अमेरिका) - असे म्हणतात गुन्हा किती झाकून ठेवला, तरी त्याला वाचा फुटतेच. हो, तो उजेडात यायला कधी-कधी खूप उशीरही होतो. अमेरिकेतही असेच एक प्रकरण समोर आले आहे. तेथील पोलिसांनी 30 वर्षांपूर्वी 8 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपीला आता अटक केली आहे. अमेरिकेच्या इंडियानामध्ये सोमवारी 59 वर्षीय एका व्यक्तीवर 8 वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण करून हत्येची आरोपनिश्चिती झाली आहे. या नराधमाचे नाव जॉन मिलर (59) असे आहे. 

 

30 वर्षे मोकाट होता नराधम

एका कंडोमच्या आधाराने तब्बल 30 वर्षांनंतर पोलिसांना मिळालेले यश चकित करणारे आहे. 1988 मध्ये जेव्हा ही घटना घडली होती, तेव्हा मुलीचे वय 8 वर्षे होते.

आरोपीने 30 वर्षांपूर्वी 8 वर्षीय बालिकेवर रेप करून तिची हत्या केली होती. चिमुरडीचा मृतदेह पोलिसांना एका खड्ड्यात आढळला होता.
ही घटना अमेरिकेच्या इंडियानातील आहे. पोलिसांनी 59 वर्षीय आरोपी जॉन मिलरला गत रविवारी त्याच्या राहत्या घरातून अटक केली. आरोपीचे डीएनए मृत मुलीच्या कपड्यांवर आढळलेल्या डीएनएशी जुळल्यानंतर आरोपीला अटक होऊ शकली. पोलिसांनी चार्जशीटमध्ये सांगितले की, घटनेनंतर चिमुकलीच्या कुटुंबीयांनी 1988 मध्ये ती हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. याच्या 3 दिवसांनंतर पोलिसांना बालिकेचा मृतदेह एका खड्ड्यात आढळला होता.

 

सणकी आरोपीनेच दिले होते पकडून दाखवण्याचे आव्हान
पोलिसांनी सांगितले की, या घटनेबाबत आरोपी मिलरच्या घरी पोहोचून पोलिसांनी त्याची चौकशी केली. पोलिस त्याला म्हणाले होते की, तुला माहितीये आम्ही कोणत्या कारणासाठी तुझ्या घरी आलो आहोत. तेव्हा त्याने जराही न घाबरता मृत मुलीचे नाव घेतले. आणि पोलिसांना सांगितले की, त्याने 1 एप्रिल 1988 रोजी तिचे अपहरण केले होते. यानंतर तिच्या बलात्कार केला. मग गळा दाबून तिची हत्याही केली. त्याने पोलिसांना सांगितले होते की, तिचा मृतदेह फेकण्याआधी तिने एक दिवसभर आपल्या घरातही ठेवला होता.
आरोपी मिलर जागोजागी कंडोम आणि हाताने लिहिलेल्या काही नोट्स सोडून पोलिसांना अटकेसाठी आव्हान देत होता. काही नोट्सवर पोलिसांना आढळले की, आरोपी आणखी अशाच प्रकारच्या हत्या करण्याची धमकी देत आहे. परंतु पोलिसांना असे करणारा तोच आहे, याचा पुरावा सापडत नव्हता.


कंडोमने असे पकडले आरोपीला..
याप्रकरणी तपास करणाऱ्या इंडियाना पोलिसांनी 2004 मध्ये आरोपीच्या घराजवळून काही वापरलेले कंडोम ताब्यात घेतले होते. या कंडोमच्या नमुन्यातील डीएनए मृत मुलीच्या कपड्यांवर आढळलेल्या डीएनएशी जुळल्यानंतर पोलिसांच्या हाती सबळ पुरावा आला. यानंतर पोलिसांनी क्राइम सीन तयार करून डीएनएच्या आधारे आरोपी मिलरला घटनेच्या 30 वर्षांनंतर अटक केली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

बातम्या आणखी आहेत...