आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trump यांच्या प्रवक्त्या असल्याने हॉटेलने हकलून लावले, Official पेजवरून केले ट्वीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेत एका हॉटेलने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवक्त्या सारा सॅन्डर्स यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ट्रम्प यांच्या प्रवक्त्या असल्यानेच आपल्यावर ही कारवाई करण्यात आली अशी तक्रार सॅन्डर्स यांनी केली आहे. परंतु, त्यांनी तक्रारीचे ट्वीट आपल्या खासगी नव्हे, तर चक्क अधिकृत प्रेस सेक्रेटरी या ट्विटर अकाउंटवरून केले आहे. त्यामुळे, हॉटेलने जे काही केले ते बाजूलाच राहिले. तसेच सॅन्डर्स यांना अधिकृत ट्विटर अकाउंटचा खासगी वापर करता येणार नाही असा वाद सुरू झाला. विरोधकांनी हे ट्वीट कायद्याचे उल्लंघन आहे असे म्हटले आहे. 


असे आहे प्रकरण...
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवक्त्या सारा सॅन्डर्स लेक्झिंगटन येथील रेड हेन हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेल्या होत्या. परंतु, तेथील हॉटेल मालकाने कथितरीत्या तुम्ही ट्रम्पसाठी काम करता ना? मग इथून चालते व्हा असे म्हटले आहे.
- या घटनेची माहिती सारा यांनीच ट्वीट करून दिली. परंतु, आपल्यासोबत घडलेल्या कथित प्रकाराची माहिती त्यांनी खासगी ट्विटर अकाउंटवरून जाहीर केली नाही. त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हॉटेल मालकावर टीका केली. 
- आपल्याला अशी वर्तनुक मिळाल्यानंतरही आपण काहीच बोललो नाही आणि शांतपणे तिथून निघून गेलो असा दावा त्यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर आपण नेहमीच इतरांचा आदर करतो अगदी आपल्या विरोधकांना सुद्धा मान सन्मान देतो आणि यापुढे सुद्धा देणार असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. 


कायद्याचे उल्लंघन, अधिकारांचा गैरवापर
- या हॉटेल मालकावर अद्याप कुणीही टीका केली नाही. परंतु, सगळ्याच विरोधकांनी एकत्रित येऊन सारा सॅन्डर्स यांची खरडपट्टी काढली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरी पदावर असलेल्या व्यक्तीला आपल्या खासगी कामांसाठी अधिकृत ट्विटर अकाउंट वापरता येणार नाही असे वॉल्टर शॉब यांनी सुनावले. 
- वॉल्टर शॉब यांनी ट्वीटला उत्तर देत लिहिले, "सारा मला माहिती आहे की तुम्हाला निती निर्देश किंवा एथिक्स यांच्याशी काहीही घेण-देण नाही. परंतु, आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटचा खासगी कामांसाठी वापर करणे हे नियम क्रमांक 5 CFR 2635.702(a) चे सर्रास उल्लंघन आहे. हे तर असेच झाले, की एका पोलिस अधिकाऱ्याला बाहेर काढले जाते आणि तो आपला बिल्ला काढून त्या हॉटेलला धमकावतो. त्यामुळे, सॅन्डर्स यांच्या या प्रकाराचा निषेध करतो."

- वॉल्टर शॉब अमेरिका सरकारच्या एथिक्स (नितीमत्ता) कार्यालयाचे माजी संचालक आहेत. 

बातम्या आणखी आहेत...