आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डबल एजंटला विष रशियाने दिले; 2 दिवसांत स्पष्टीकरण द्या, अन्यथा कारवाई करू -ब्रिटन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी रशियाला या विष प्रयोगाचे स्पष्टीकरण दोन दिवसांत देण्याचे आव्हान दिले आहे. - Divya Marathi
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी रशियाला या विष प्रयोगाचे स्पष्टीकरण दोन दिवसांत देण्याचे आव्हान दिले आहे.

लंडन / वॉशिंग्टन - डबल एजंट सेरजी स्क्रिपल आणि त्याच्या मुलीला रशियानेच विष दिले असा दावा ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी संसदेत केला. एवढेच नव्हे, तर रशियन लष्कर आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना खडेबोल सुनावताना दोन दिवसांत या कृत्याचे उत्तर द्यावेच लागेल असे आव्हान दिले आहे. स्क्रिपल आणि त्याच्या मुलीला देण्यात आलेले विष नोव्हिचोक नावाचे विष आहे. हे विष रशियन लष्कराकडून वापरले जाते. त्यांनी आमच्या जमीनीवर ही कारवाई केलीच कशी असा सवाल देखील मे यांनी उपस्थित केला आहे. रशियाने मात्र, ब्रिटनचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. तर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या आरोपांवर दुर्लक्ष केले. 

 

कारवाईचा इशारा
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी रशियाला या विष प्रयोगाचे स्पष्टीकरण दोन दिवसांत देण्याचे आव्हान दिले आहे. एवढेच नव्हे, तर बुधवारपर्यंत उत्तर नाही मिळाल्यास रशियाने आमच्या जमीनीवर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करून मोहिम राबवली असे गृहित धरले जाईल. तसेच याचे चोख प्रत्युत्तर रशियाला आमच्याकडून दिले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. रशियाच्या या आरोपांचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी समर्थन केले आहे. 

 

कोण होता स्क्रिपल..?
रशियाचा गुप्तहेर असतानाही त्याने ब्रिटनसाठी रशियाचीच हेरगिरी केली होती. रशियात कैद झाल्यानंतर 2010 मध्ये त्याला ब्रिटनमध्ये करार करून आणण्यात आले. यानंतर त्याच्या पत्नीचा कार अपघातात मृत्यू झाला. काही दिवसांतच कार अपघातातच मुलाचा मृत्यू झाला. आता या माजी एजंटवरच विष प्रयोग करण्यात आला आहे. 

 

येथे क्लिक करून जाणून घ्या, डबल एजंट स्क्रिपलची सत्यकथा आणि संपूर्ण माहिती...

बातम्या आणखी आहेत...