आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियात क्षेपणास्त्र हल्ला करू; ट्रम्प यांची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमास्कस - बशर अल-असाद यांचे समर्थन केल्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला सिरियात क्षेपणास्त्र हल्ला करू, अशी धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी बुधवारी हे ट्विट केले. नागरिकांवरील रासायनिक हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेची क्षेपणास्त्रे येत आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दुसरीकडे कोणत्याही क्षेपणास्त्राला पाडण्यात येईल, असा इशारा रशियाने दिला आहे.  


आपल्याच नागरिकांची रासायनिक हल्ल्याद्वारे हत्या करत आहेत, अशांना मदत केली जाऊ नये. खरे तर अमेरिका-रशिया यांच्यातील संबंध शीतयुद्धापेक्षा वाईट आहेत. अमेरिकेने अशा प्रकारचा प्रयत्न केल्यास अमेरिकेचे लाँच पॅडलाही रशिया उद्ध्वस्त करेल, असे लेबनॉनमधील रशियाचे राजदूत अलेक्झांडर जासिप्किन यांनी स्पष्ट केले. लष्करी हल्ला झाल्यास त्याचे परिणाम घातक ठरेल, असा इशारा रशियाचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी वॅसिली नेंबेजिया यांनी दिला आहे.  


प्रस्ताव मंजूर झाला नाही : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत सिरियातील रासायनिक हल्ल्याच्या तपासासाठी समग्र निगराणी तंत्र बनवण्यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. त्यावर संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी निकी हॅली म्हणाल्या, जग या संस्थेकडे आशेने पाहते. मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचे काम संयुक्त राष्ट्रामध्ये केले जात आहे, असा आरोप रशियाच्या प्रतिनिधी व्हॅसिली नेबेंजिया यांनी
केला आहे. त्यावरून चांगलीच खडाजंगी झाली.

 

अमेरिकी ड्रोनला जाम करण्याचे काम  
रशियाच्या लष्कराने सिरियात उड्डाण करणाऱ्या अमेरिकेच्या ड्रोनला जाम करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचा परिणाम अमेरिकेच्या ड्रोनवर झाला आहे. अमेरिकेच्या चार अधिकाऱ्यांनी त्याबाबतची पुष्टी दिली आहे. हल्ल्याच्या भीतीने अनेक आठवड्यांपूर्वीच रशियाने अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीला जाम करण्याचे काम केले आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...