आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढ्या भयंकर दुष्काळ की, अन्नाच्या दाण्याला तरसले लोक, बाजारात विकत होते मानवाचे मांस, आपल्याच मुलांचा घेत होते घास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या जागतिक महायुद्धानंतर रशियात भयाण दुष्काळ पडला होता. - Divya Marathi
पहिल्या जागतिक महायुद्धानंतर रशियात भयाण दुष्काळ पडला होता.

इंटरनॅशनल डेस्क/मॉस्को - 100 वर्षांपूर्वी रशियामध्ये एक काळ असा आला होता जेव्हा लोक भुकेने तडफडू लागले होते. या भयंकर दुष्काळात लोक एकमेकांनाच खाण्यासाठी मजबूर झाले होते. रशियाची ही अवस्था दुष्काळ अन् पहिल्या महायुद्धानंतर बनली होती. तेव्हा लोकं मानवी मांस खाण्यासाठी मजबूर झाले होते. हा 1921 ते 1922 चा काळ होता. तब्बल 3 कोटी लोकसंख्या या दुष्काळाचा सामना करत होती. दुसरीकडे, अंदाजे 5 लाख लोकांना आपले प्राणही गमवावे लागले होते.

 

बाजार विकत होते मानवाचे मांस
पहिल्या महायुद्धामुळे (1914-1918) सोव्हियत युनियतची आर्थिक घडी विस्कटली होती. रशिया त्या वेळी सोव्हियत युनियनचा भाग होता. देशात भयंकर दुष्काळ पडला आणि लोकं अन्नाच्या दाण्याला मोताद झाले. परिस्थिती एवढी चिघळली की, लोक लपून-छपून मानवाचे मांस खाऊ लागले होते. पाहता-पाहताच अशी भयानक वेळ आली की, खुलेआम जागोजागी माणसाच्या मांसाचा बाजार लागू लागला होता.

 

आपल्या मुलांचे अन् कुटुंबातील इतर सदस्यांचेच करत होत भक्षण
या प्रकरणांवर रिसर्च करणारे रशियन संशोधकाने सांगितले होते की, एका महिलेने आपल्या पतीची डेडबॉडी द्यायला फक्त यासाठी नकार दिला होता, कारण तिला त्याचा मांसासारखा वापर करायचा होता. अमेरिका आणि युरोपातून येथे मदत करायला आलेल्या बचावकर्मींनी सांगितले की,  अनेक कुटुंबातील लोक तर आपल्या घरातील बुजुर्ग अन् लहान मुलांचाच घास घेऊ लागले होते. 'मिरर'ने 16 जानेवारी 1922 रोजी यासंबंधी एक रिपोर्टही दिली होती, ज्यात सांगितले होते की, सामराच्या पुजेत्वेस्क जिल्ह्यातील मोक्सचा गावात एका महिला आपल्या मुलीचा मृतदेह खाताना आढळली. अशा रिपोर्ट्स आल्या की, लोकांनी स्मशानभूमीलाच आपले घर बनवले, जेणेकरून तेथे येत असलेल्या मृतदेहांना ते ताब्यात घेऊन फस्त करू शकतील.

 

पोलिसही करत नव्हते विरोध
यादरम्यान लोक खुलेआम माणसांना मारून त्यांचे मांस विकत होते. यासाठी हत्यासुद्धा सुरू झाल्या होत्या, परंतु पोलिसांनी याचा विरोध केला नाही. सरकारनेही हे कबूल केले होते की, जिवंत राहण्यासाठी माणूस प्रत्येक शेवटचा पर्याय चाचपडून पाहू शकतो. मानवाच्या इतिहासातील हा बहुधा सर्वात भयंकर दुष्काळ असावा.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या दुष्काळाचे आणखी काही Photos..  

 

बातम्या आणखी आहेत...