आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS विरोधातील युद्धाचा समारोप, सीरिया दौऱ्यात पुतिन यांनी दिले हवाई दलाला परतीचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सीरियात आयसिस विरुद्धच्या कारवाईचा समारोप झाल्याची घोषणा केली. सीरियाच्या हेमिमीम हवाई तळावर पुतिन यांनी ही घोषणा केली आहे. यासोबतच, त्यांनी सीरियातील रशियन निरीक्षकांना आणि हवाई दलास परतीचे आदेश दिले आहेत. यावेळी उपस्थित असलेले रशियाचे संरक्षण मंत्री सेरजी शोइगू यांनी सांगितल्याप्रमाणे, आमच्या सैनिकांना अवघ्या 2 वर्षांत आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयसिसचा नायनाट केला. पुतिन यांचा हा पहिलाच रशिया दौरा आहे.

 

गृहयुद्धात 5 लाख नागरिकांचा बळी
- सीरियात गेल्या 6 वर्षांपासून सुरू असलेल्या यादवी आणि संघर्षात किमान 4 लाख 65 हजार नागरिकांचा बळी गेला आहे. 
- आंतरराष्ट्रीय शरणार्थी संघटनेचे उपाध्यक्ष अब्दुल्ला रसूल देमीर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्या सर्वांचा मृत्यू युद्धातील हल्ल्यांत आणि तुंरुंगांमध्ये झाला आहे. 
- सीरियातील यादवी आणि नरंसहार हा शतकातील सर्वात क्रूर अमानवीय अत्याचार आहे. तरीही मोठ-मोठे देश आपल्या डोळ्यांवरील पट्टी सुद्धा काढायला तयार नाहीत. 
- देमीर यांनी ही आकडेवारी मार्च 2011 ते नोव्हेंबर 2017 पर्यंत गोळा केलेल्या माहितीच्या आधारे जारी केली. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 26, 466 लहान मुलांचाही समावेश आहे. तसेच 1 कोटी 30 लाख लोकांनी घर सोडून दुसऱ्या देशांत किंवा सीमेवर शरण घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...