आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामॉस्को- अखेर सर्व अंदाज खरे ठरले. रशियाची सत्ता पुढील सहा वर्षे व्लादिमीर पुतीन यांच्या हातातच राहील. रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण १०.७ कोटी मतदारांपैकी ६७.७% लोकांनी मतदान केले. त्यात पुतीन यांना ७६.६% मते मिळाली. ‘क्रेमलिन’ या रशियाच्या अध्यक्षांच्या कार्यालयानेही अशाच निकालांची भविष्यवाणी केली होती.या विजयानंतर पुतीन म्हणाले की, मतदारांनी माझ्या कामावर शिक्कामोर्तब केले आहे. पुतीन यांनी ही निवडणूक आपल्या युनायटेड रशिया या पक्षाकडून लढण्याऐवजी अपक्ष लढवली होती. आपण रशियातील सर्वात शक्तिशाली आणि लोकप्रिय नेते आहोत हा संदेश सर्वांना देण्यात ते यशस्वी झाले आहेत. पुतीन यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार करोडपती कम्युनिस्ट नेते पॉवेल गुरुदिनीन यांना १२% मते मिळाली. एकमेव महिला उमेदवार कसेनिया सोबचक यांना फक्त २% च मते मिळाली. पुतीन यांचा विजय झाला असला तरी मतदान केंद्रांवर घोटाळे झाल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. विरोधकांनुसार, मतपेट्यांत बनावट मते टाकण्यात आली. कारण पुतीन यांना ऐतिहासिक विजय मिळावा, अशी सरकारची इच्छा होती. गोलोस या गैरसरकारी मॉनिटरिंग ग्रुपनुसार,त्यांच्या पर्यवेक्षकांनी २००० पेक्षा जास्त ठिकाणी मतदानात घोटाळे होताना पाहिले आहे.
पुतीन : हेर ते शक्तिशाली नेता होण्याचा प्रवास
- ७ ऑक्टोबर १९५२ ला लेनिनग्राडमध्ये (आता सेंट पीटर्सबर्ग) जन्म. बालपण गरिबीत गेले. उंदीर पकडण्याचे कामही करावे लागले.
- या निवडणुतीत पुतीन यांनी दावा केला की, त्यांचे आजोबा स्टॅलिन यांचे स्वयंपाकी होते. त्यांचे वडील स्पिरिडोनोविच लष्करात काम करत होते.
- लॉचे शिक्षण झाल्यानंतर केजीबी या सुरक्षा संस्थेत दाखल. जर्मनीत हेरही होते. केजीबीचे काही सहकारी पुतीन युगात वरिष्ठ पदांवर राहिले.
- १९९० या दशकात सेंट पीटर्सबर्गचे महापौर अँटोनी सोबचक यांच्या संपर्कात आले. सोबचक हे त्यांचे लॉचे शिक्षक होते.
- १९९७ मध्ये पुतीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्तसिन यांच्या सरकारमध्ये आले. त्यांना केंद्रीय सुरक्षा सेवेच्या प्रमुखपदाची जबाबदारीही मिळाली.
- २००० मध्ये अध्यक्षपदी निवड. २००४ मध्ये पुन्हा विजय. २००८-१२ पर्यंत पंतप्रधान. २०१२ मध्ये अध्यक्ष झाले. कालावधीत वाढ.
लोकांचा आत्मविश्वास, अपेक्षेमुळे झाली अध्यक्षपदावर फेरनिवड
‘मी या निकालाकडे आपल्या लोकांचा आत्मविश्वास आणि अपेक्षा या दृष्टीने पाहत आहे. माझे म्हणणे ऐका. तुम्ही जे म्हणत आहात त्यामुळे मला थोडेसे हसू येत आहे. मी वयाच्या १०० वर्षांपर्यंत पदावर राहीन की नाही.
- व्लादिमीर पुतीन, रशियाचे अध्यक्ष
राष्ट्रवादी प्रतिमा अन् पश्चिमेच्या विराेधाने पुतीन ठरले अजिंक्य
निवडणुकीचा निकाल काय लागेल, हे माहीत हाेते, असे प्रा.हर्ष पंत सांगतात. पश्चिमेकडील देशांचा कणखरपणे सामना केवळ मीच एकटा करू शकताे, असे मतदारांच्या मनावर बिंबवण्यात पुतीन यशस्वी ठरले अाहेत. अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत हस्तक्षेपाच्या बातम्या व पश्चिमेच्या अार्थिक नाकाबंदीने पुतीन यांना अधिक शक्तिशाली बनवले अाहे. परिणामी, रशियाच्या अमेरिका व ब्रिटनशी असलेल्या संबंधात अाणखी कटुता येऊ शकते.
- रशियात क्रेमलिन सर्वात ताकदवान आहे. प्रसारमाध्यमांपासून ते स्वतंत्र संस्थांवर क्रेमलिनचाच दबदबा अाहे. पुतीन यांचे प्रतिस्पर्धी ७ उमेदवार खूपच कमकुवत हाेते. तसेच मजबूत प्रतिस्पर्ध्यांना निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्यात अाला.
- निवडणुकीदरम्यान ब्रिटनने रशियाच्या २३ मुत्सद्यांना परत पाठवल्यानंतर पुतीन यांनीही ब्रिटनच्या २३ मुत्सद्यांना देशाबाहेर काढले. यातून पुतीन कधीही पश्चिमेकडील देशांसमाेर झुकणार नाही, असा संदेश गेला.
घाेटाळ्याचा अाराेप
१,७०० केंद्रांतील मतपेट्यांमध्ये पुतीन यांच्या बाजूने अगाेदरच मतपत्रिका टाकल्या हाेत्या, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
पुतीन यांची १८ वर्षे; पुतीन यांच्या सत्ताकाळात नागरिकांना १२० % वेतनवाढ; अाता कमी
- पुतीन यांच्या १८ वर्षांच्या सत्ताकाळात रशियातील बहुतांश नागरिकांचे जीवनमान उंचावले अाहे. अागामी सहा वर्षांत देशातील गरिबांची संख्या निम्म्यावर अाणली जाईल, असे अाश्वासन दिले अाहे. सध्या देशात सहा काेटी नागरिक गरीब अाहेत.
- पुतीन यांच्या पहिल्या कार्यकाळात नागरिकांचे वेतन १०६ % व दुसऱ्या कार्यकाळात १२० % वाढले. ही वाढ नऊ वर्षे हाेत राहिली. त्यानंतर तिसऱ्या कार्यकाळात मंदीमुळे नागरिकांचे वेतन ७ % कमी झाले.
- कारबाबत रशिया पाेलंड, हंगेरीच्या बराेबरीत अाहे. युराेपियन अाॅटाेमाेबाइल असाेसिएशननुसार रशियात दर १०० घरांमागे ५६ कार.
- सध्या नैसर्गिक वायू व तेलाच्या कमी उपलब्धतेमुळे रशियाची अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत अाहे. ही जगातील १२ वी सर्वात माेठी अर्थव्यवस्था असून, रशियाचा जीडीपी दर १.५ % अाकारला गेला अाहे.
स्टॅलिननंतर सर्वाधिक काळ सत्ता गाजवणारे नेते पुतिन
- पुतिन सर्वप्रथम 2000 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. यानंतर 2004 मध्ये पुन्हा निवडून आले आणि 2008 पर्यंत देशाचे राष्ट्राध्यक्ष राहिले. त्यावेळी दोनदाच राष्ट्राध्यक्ष पदावर राहण्याची मर्यादा होती. त्यामुळे, त्यांनी पंतप्रधान पदाची निवडणूक लढवली.
- 2008 ते 2012 पर्यंत पंतप्रधान राहिल्यानंतर त्यांनी आपल्या बहुमताचा वापर करून राज्यघटनेत बदल केला. तसेच दोनदा राष्ट्राध्यक्ष होण्याची अट संपुष्टात आणतानाच राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ 4 वरून 6 वर्षे केला.
- 2012 मध्ये ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आणि पुढची 6 वर्षे रशियातील सर्वात शक्तीशाली नेते म्हणून समोर आले. आता राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत 76 टक्के मते मिळवून त्यांनी रशियाच्या राजकारणात आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.
- सोव्हिएत संघाचे तानाशहा म्हणूनही ओळखल्या जाणारे जोसेफ स्टॅलिन यांनी 1922 ते 1952 असे 30 वर्षांपर्यंत सत्ता गाजवली. त्यांच्यानंतर पुतिन सर्वात जास्त काळ सत्तेवर राहणारे नेते बनले आहेत.
पुतिन यांना 76% मते
उमेदवार | व्होट % | |
1. | व्लादिमीर पुतिन | 76.66 |
2. | पॉवेल ग्रुडिनिन | 11.8 |
3. | व्लादिमीर जिरिनोव्हस्की | 5.67 |
4. | कसीनिया सोबचक | 1.67 |
5. | ग्रिजोरी येव्हलिंस्की | 1.04 |
6. | बोरिस टीटोव्ह | 0.76 |
7. | मॅक्सिम सुरायकिन | 0.68 |
पुढील स्लाइड्सवर वाचा, 11 कोटी जनतेने केले मतदान असे होते दृश्य...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.