आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमधील कैद्यांचा मुद्दा ऐरणीवर आणणार, दलबीर कौर यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिरसा - सरबजित यांची बहीण दलबीर कौर यांनी पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीयांसाठी लढा देणार असल्याचे म्हटले आहे. अनेक वर्षांपासून ३०० पेक्षा अधिक भारतीय कैदी पाकच्या तुरुंगात आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी लाहोर उच्च न्यायालयातून भारतीय कैद्यांची यादी घेतली होती. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे ही यादी दिली आहे.

 

सामाजिक संस्थांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय कोर्टापुढे हा मुद्दा आपण नेणार असल्याचे पत्रपरिषदेत दलबीर यांनी सांगितले. या वेळी नाहक बंदिस्त असलेल्या नागरिकांची उदाहरणेदेखील दलबीर यांनी दिली आहेत. हरियाणा पंजाबी सभ्याचार मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  


नानकसिंह नामक व्यक्ती १९८४ मध्ये आपल्या वडिलांसोबत शेतात गेला होता. चुकून त्याने पाक सीमेत प्रवेश केला. तो आजही पाकिस्तानच्या तुरुंगात बंद आहे. नानकसिंह तरुण आहे. त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या परतीची आशा असल्याचे दलबीर कौर म्हणाल्या. गुजरातच्या कुलदीप नामक व्यक्तीचे उदाहरणही त्यांनी दिले. कुलदीप टीबीने ग्रस्त असून पाकच्या तुरुंगात आहे. सर्जिकल स्ट्राइक हे केवळ नाटक होते, अशी टीका त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...