आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • रियाधच्या आकाशात अर्ध्या रात्री विस्फोट: बंडखोरांनी 2 क्षेपणास्त्रे डागली, सैन्याने हवेतच उडवली Saudi Says Two Houthi Missiles Intercepted Over Riyadh

रियाधच्या आकाशात अर्ध्या रात्री विस्फोट: बंडखोरांनी डागली 2 क्षेपणास्त्रे, सैन्याने हवेतच नष्ट केली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियाध - सौदी अरबची राजधानी रियाधवर रविवारी रात्री उशिरा येमेनच्या हौती बंडखोरांनी हल्ला चढवला. सौदी अरबच्या नेतृत्वातील आघाडी सैन्याने दावा केला की, सैन्याने दावा केला की, बंडखोरांनी दोन बॅलेस्टिक मिसाइल्स डागल्या होत्या, ज्या हवेतल्या हवेतच उडवण्यात आल्या आहेत. या हल्ल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. परंतु स्थानिक मीडियाचे म्हणणे आहे की, रियाधमध्ये कमीत कमी सहा जोरदार धमाके झाले. आकाशात मोठा प्रकाश पाहण्यात आला. नंतर शहरात धूर पसरला. सौदी अरबची न्यूज एजन्सी एसपीएने सांगितले की, हा हल्ला स्थानिक वेळेनुसार रात्री 8.39 वाजता झाला. 

हौती बंडखोरांची वृत्तवाहिनी अल-मसिराने म्हटले की, या हल्ल्यांमुळे रियाधमध्ये मोठे नुकसान झाले आहे. मिसाइल्सनी सौदी अरब डिफेन्स मिनिस्ट्रीशिवाय इतर संस्थांना लक्ष्य बनवले. दुसरीकडे, रियाधच्या नेतृत्वातील आघाडी सैन्याने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

2015 पासून येमेनमध्ये शिया हौती बंडखोर आणि राष्ट्रपती अबेद्राबो मन्सूर हादी यांच्या सरकारमध्ये युद्ध सुरू आहे. हौती बंडखोरांना हादी सरकार उलथवून देशावर कब्जा करायचा आहे. त्यांच्या विरोधात सौदी सरकार येमेनच्या सैन्याची साथ देत आहे. यानंतर सौदीवर हौतींनी हल्ले सुरू केले आहेत. सौदींचा आरोप आहे की, हौतींना इराणचे समर्थन मिळत आहे. तर, इराणने हा दावा फेटाळला आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...