आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञानात ब्लॅकहोल; ब्रह्मांडाची रहस्ये उलगडणारे वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग (76) यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - शतकातील सर्वात मोठे भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. २१ व्या वर्षी त्यांना असाध्य आजार झाला. शरीरातील ९२% भाग निकामी झाला. डॉक्टरांनी २ वर्षांचे आयुष्य सांगितले. मात्र पुढील ५५ वर्षांपर्यंत ते १००% काम करत राहिले. त्यांचे डोळे व मेंदू हेच काम करत होते. ते शतकातील सर्वात वेगवान मंेंदू असलेले व्यक्ती होते. 

 
- गॅलिलिअोच्या ३०० व्या पुण्यतिथीला स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला, आइन्स्टाइन यांच्या जन्मदिनी मृत्यू.
- म्हणायचे, देव अस्तित्वात नाही. ब्रह्मांड देवाने रचले नाही. ते कसे घडले, हे आपल्याला जाणायचे आहे.
 
आकाशातील ताऱ्यांकडे पाहा, पायाकडे नव्हे ...
मृत्यूची भीती वाटत नाही, मात्र त्याची घाईही नाही. खूप कामे करायची आहेत. आयुष्यात जिज्ञासू बना. पायांकडे नव्हे, ताऱ्यांकडे पाहून वाटचाल करा.               
- स्टीफन हॉकिंग
 
जगातील ७०० कोटी लोकांमध्ये स्टीफन हॉकिंग एकमेव अशी व्यक्ती होते ज्यांचे ९२% शरीर काम करत नव्हते, तरीही आयुष्यभर १००% योगदान
 
1963 जेव्हा दोन्ही पायांनी काम करणे बंद केले होते
हॉकिंगना अॅमियोट्रॉफिक लेटेरल स्लेरोसिस राेगाचे निदान. दोन्ही पायांचे काम करणे बंद.. डॉक्टर म्हणाले - दोन वर्षांपर्यंतच जगाल. केम्ब्रिजमध्ये उपचारांना सुरुवात झाली. 
कामगिरी : गुरुत्वाकर्षणावर संशोधन पूर्ण केले. पृथ्वीबाहेर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव समजावून सांगितला. 
 
1970 मध्ये दाेन्ही हात निकामी अंथरुणातून उठणेही हाेते अशक्य 
कामगिरी : कृष्णविवरांवर संशाेधन करून सांगितले की, कृष्णविवराजवळ जाणारी प्रत्येक गाेष्ट त्यात सामावते.
 
1980 जेव्हा घशातून आवाजही निघणे बंद झाले 
हळूहळू आवाज जाऊ लागला तर डोळे व बोटांनी संवाद साधू लागले. केम्ब्रिज विद्यापीठाच्या मदतीने लाइफ सपोर्ट सिस्टिम तयार केली. स्पेशल स्पेलिंग कार्ड बनवले गेले. या माध्यमातून ते संवाद साधायचे. 
कामगिरी : बिग बँग सिद्धांतावर संशोधन. पृथ्वीची निर्मिती कशी झाली, सध्याचे तिचे स्वरूप कसे निर्धारित झाले, हे सांगितले.
 
1986 जेव्हा शरीराची अंतर्गत यंत्रणा बिघडली
न्यूमोनियाने प्रकृती खालावली. वजन ४० किलो कमी. कॉम्प्युटर प्रोग्रामद्वारे काम सुरू. 
कामगिरी : ब्रह्मांडाचा कोणताही प्रारंभ-अंत नाही, बिगबँगआधी पृथ्वी कशी होती, हेही सांगितले. 
 
1990 जेव्हा बोटांची हालचाल बंद झाली
मांसपेशींनी काम करणे बंद केले. वजन ३० किलो घटले. स्पीच सिंथेसायझरच्या माध्यमातून बोलणे व अध्ययन सुरू ठेवले. 
कामगिरी : बिग बँगवर नवे संशोधन. पृथ्वीचा आकार घटू-वाढू शकतो, हे सांगितले.
 
> 1996 जेव्हा 92% शरीर काम करत नव्हते. फक्त मेंदू अाणि डाेळेच कार्यरत हाेते. विशेष व्हीलचेअर तयार करून घेतली, जी स्टीफन यांची अाेळखच बनली. उर्वरित अायुष्य याच खुर्चीवर. 
कामगिरी : द नेचर ऑफ स्पेस अँड टाइमचे ६ मालिकांचे व्याख्यान दिले.

 

हॉकिंग यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती...

- 8 जानेवारी 1942 रोजी ऑक्सफोर्ड येथे जन्मलेले स्टीफन हॉकिंग यांनी 1959 मध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठातूनच पद्वीसाठी प्रवेश घेतला. पदवीच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असताना आइस स्केटिंग अपघात झाला. 
- त्यावेळी ते फक्त 22 वर्षांचे होते. त्यांना न्युरॉन संबंधित आजार झाला होता. तसेच डॉक्टरांनी त्यांना जगण्यासाठी फक्त 2 वर्षे दिली होती. तरीही मृत्यूवर मात करून त्यांनी फक्त पीएचडी पूर्ण केली नाही, तर पुढचे 42 वर्षे जगले. 
- मात्र, या आजाराने त्यांना कायमचे व्हीलचेअरवर बसण्यास मजबूर केले. 1974 मध्ये त्यांनी ब्लॅक होल्समधून (कृष्ण विवर) निघणाऱ्या रेडिएशनचा शोध लावला. त्यालाच हॉकिंग रेडिएशन असे नाव देण्यात आले. 
- 1979 मध्ये त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात Lucasian Professor of Mathematics चा किताब मिळवला. सर आयझॅक न्युटन नंतर हे पद मिळवणारे ते पहिले संशोधक ठरले. 
- 1988 मध्ये त्यांनी अ ब्रीफ हिस्ट्री नावाचे पुस्तक प्रकाशित केले. त्या पुस्तकाच्या तब्बल 1 कोटी कॉपी विकल्या गेल्या. 1990 मध्ये त्यांनी नाइटहूड पुरस्कार देण्याची घोषणा झाली. परंतु, ब्रिटन सरकार विज्ञान आणि संशोधनावर खर्च करत नसल्याची तक्रार करत त्यांनी तो सन्मान नकारला.

 

हेही वाचा...

डॉक्टरांनी सांगितले होते फक्त 1.5 वर्ष जगणार; हे एक कोडे सोडवू शकले नाही स्टीफन

बातम्या आणखी आहेत...